Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»दीड वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर गरिबांच्या रेशनवर पुन्हा साखर;

जळगाव

दीड वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर गरिबांच्या रेशनवर पुन्हा साखर;

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraJanuary 23, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

‘अंत्योदय’च्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा

​जळगाव (प्रतिनिधी): जिल्ह्यातील अंत्योदय अन्नयोजनेच्या हजारो लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या दीड वर्षांपासून रेशन दुकानांवरील साखरेचा पुरवठा पूर्णपणे खंडित झाल्याने गोरगरिबांमध्ये मोठी नाराजी होती. मात्र, आता राज्य शासनाकडून साखरेचा साठा प्राप्त झाला असून, नोव्हेंबर २०२५ ते मार्च २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी पात्र लाभार्थ्यांना साखरेचे वाटप करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील गरजू लाभार्थ्यांची गोड चव पुन्हा परतणार आहे.

​एप्रिल २०२४ पासून पुरवठा होता ठप्प
​जिल्ह्यात एप्रिल २०२४ पासून रेशनवर साखर मिळणे बंद झाले होते. गरिबांना खुल्या बाजारात ४० ते ४५ रुपये किलो दराने साखर खरेदी करावी लागत होती, ज्याचा मोठा आर्थिक फटका अंत्योदय कार्डधारकांना बसत होता. दिवाळी, दसरा यांसारख्या मोठ्या सणांमध्येही रेशनवर साखर न मिळाल्याने सर्वसामान्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून सहा महिन्यांचा एकत्रित साठा मंजूर करून घेतला आहे.

​जिल्ह्याची मागणी आणि पुरवठ्याची सद्यस्थिती
​जिल्हा पुरवठा विभागाने तीन महिन्यांच्या टप्प्यासाठी एकूण ८ हजार १४६ क्विंटल साखरेची मागणी नोंदवली होती. त्यापैकी आतापर्यंत ४ हजार ७५१ क्विंटल साखर जिल्ह्यात प्राप्त झाली आहे. जिल्ह्याची एकूण १७ गोदामे असून, या साखरेचे वितरण तालुकानिहाय गोदामांमध्ये सुरू करण्यात आले आहे. अनेक तालुक्यांमध्ये १०० टक्के पुरवठा झाला असून, उर्वरित तालुक्यांमध्येही येत्या काही दिवसांत साखर पोहोचणार आहे.

​तालुकानिहाय साखरेची सविस्तर स्थिती (तक्ता)
​साखरेचा पुरवठा काही तालुक्यात पूर्ण झाला आहे, तर काही ठिकाणी प्रलंबित आहे. त्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: तालुका/गोदाम मागणी (क्विंटल) प्राप्त पुरवठा (क्विंटल) सद्यस्थिती
एरंडोल ३५३ ३५३ १००% पूर्ण
भुसावळ ३१४ ३१४ १००% पूर्ण
सावदा २३१ २३१ १००% पूर्ण
मुक्ताईनगर २९६ २९६ १००% पूर्ण
कुऱ्हा १९२ १९२ १००% पूर्ण
पाचोरा ५७३ ५७३ १००% पूर्ण
भडगाव ४२० ४२० १००% पूर्ण
अमळनेर ५४२ ५४२ १००% पूर्ण
रावेर २१३ २१३ १००% पूर्ण
जामनेर ६१२ २५० अपूर्ण
बोदवड ६४५ ३१० अपूर्ण
पारोळा ४४२ २०७ अपूर्ण
यावल ४३१ ४५ अपूर्ण
जळगाव माहिती उपलब्ध ०० प्रलंबित
धरणगाव ४२४ ०० प्रलंबित
चाळीसगाव १०३१ ०० प्रलंबित
चोपडा ६१८ ००. . कधी होणार प्रत्यक्ष वाटप?
​ज्या तालुक्यांच्या गोदामांमध्ये साखरेचा पुरवठा अद्याप शून्य किंवा अपूर्ण आहे, तिथे पुढील आठवड्यात साठा पोहोचण्याची शक्यता आहे. सर्व तालुक्यांच्या गोदामांमध्ये १०० टक्के पुरवठा झाल्यानंतर, जिल्हा पुरवठा विभाग एकाच वेळी संपूर्ण जिल्ह्यात अधिकृत वितरण सुरू करण्याचे आदेश देईल. एप्रिल २०२४ पासून साखर न मिळाल्याने आता सहा महिन्यांची साखर एकत्र मिळणार असल्याने लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
​
“जिल्ह्यात अंत्योदय लाभार्थ्यांच्या साखरेसाठी आम्ही विशेष मागणी केली होती. सद्यस्थितीत अनेक गोदामांमध्ये साठा पोहोचला आहे. ज्या ठिकाणी अद्याप पुरवठा झालेला नाही, तिथे कार्यवाही सुरू आहे. सर्व गोदामांमध्ये आवश्यक साखर उपलब्ध होताच एकाच वेळी सर्व पात्र लाभार्थ्यांना रेशनवर साखरेचे वितरण सुरू केले जाईल.”
— रुपेश ब्रिजेवार, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add