Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»जळगाव शहरात बुलेटसह चार दुचाकी चोरीला चोरट्यांचा सुळसुळाट;

जळगाव

जळगाव शहरात बुलेटसह चार दुचाकी चोरीला चोरट्यांचा सुळसुळाट;

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraJanuary 25, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

चार दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत

जळगाव । जळगाव शहरात दुचाकी चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, शहराच्या विविध भागांतून महागडी बुलेटसह एकूण चार दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणी जिल्हापेठ, रामानंदनगर, एमआयडीसी व शहर पोलीस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ओंकार नगरातील रहिवासी उमेश ललित सूर्यवंशी हे २० जानेवारी रोजी चोपडा मार्केट परिसरात कामानिमित्त गेले होते. त्यांनी आपली दुचाकी (क्रमांक एमएच-१९, डीए-५०१७) मार्केट परिसरात उभी केली होती; मात्र अवघ्या दोन तासांत अज्ञात चोरट्यांनी ती लंपास केली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दुसरी घटना नागेश्वर कॉलनी परिसरात घडली आहे. सुनील सदानंदन किझुमायील यांची सुमारे ४५ हजार रुपये किमतीची बुलेट (क्रमांक एमएच-१९, सीएच-००८९) १७ जानेवारी रोजी मध्यरात्री त्यांच्या घरासमोरून चोरीला गेली. मंगळवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला.

तिसरी घटना पांडुरंगनगर भागातील फुले मार्केट परिसरात घडली. जितेंद्र निंबा चौधरी यांनी १४ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता आपली दुचाकी (क्रमांक एमएच-४१, एडी-८१४९) मार्केटमध्ये उभी केली होती. रात्री ८ वाजता परत आल्यानंतर दुचाकी जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, अयोध्या नगरातील लक्ष्मी पार्क परिसरातही दुचाकी चोरीची घटना घडली आहे. जितेंद्र संजय पाटील (वय ३३, व्यवसाय चालक) यांनी मंगळवारी आपली दुचाकी घरासमोर लावली होती; मात्र काही वेळातच ती चोरीला गेल्याचे आढळून आले. याप्रकरणी पुढील तपास हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील हे करीत आहेत. शहरात वाढत असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add