Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»परिवहन»जळगावतून आणखी एक अमृत भारत एक्सप्रेस धावणार;

परिवहन

जळगावतून आणखी एक अमृत भारत एक्सप्रेस धावणार;

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraJanuary 25, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगावकरांसाठी रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे.

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावकरांसाठी रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. जळगाव आणि भुसावळ मार्गे आणखी एक नवीन अमृत भारत एक्सप्रेस धावणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून पनवेल- अलीपुरद्वार अमृत भारत एक्सप्रेस (DN-11031/ UP-11032) ट्रेन सुरु करण्यात आली आहे. या गाडीला जळगाव-भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आला असून यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

ट्रेन क्रमांक 11031 पनवेल जंक्शन-अलीपुरद्वार जंक्शन अमृत भारत एक्सप्रेस दर सोमवारी सकाळी 11:50 मिनिटांनी पनवेल जंक्शनवरून सुटेल आणि बुधवारी दुपारी 01:50 मिनिटांनी वाजता अलीपुरद्वार जंक्शन स्टेशनवर पोहोचेल. तर, ट्रेन क्रमांक 11032 अलीपुरद्वार जंक्शन- पनवेल जंक्शन अमृत भारत एक्सप्रेस दर गुरुवारी पहाटे 04:45 वाजता अलीपुरद्वार जंक्शनवरून सुटेल आणि शनिवारी पहाटे 05:30 वाजता पनवेल जंक्शन स्टेशनवर पोहोचेल.

या स्थानकांवर थांबणार?
कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, मिर्झापूर, पं. दीन दयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, सोनपूर, हाजीपूर, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, कटिहार, न्यू जलपाईगुडी, सिलीगुडी यांसह अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर ही एक्सप्रेस थांबणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add