Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»परिवहन»जिल्ह्यात १ लाख ८ हजार ९६ लाडक्या बहिणींचा हप्ता रखडला

परिवहन

जिल्ह्यात १ लाख ८ हजार ९६ लाडक्या बहिणींचा हप्ता रखडला

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraJanuary 25, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

ई-केवायसीतील चुकांमुळे लाभ थांबला; अंगणवाडी सेविकांकडून पडताळणी सुरू होणार

जळगाव प्रतिनिधी : राज्य शासनाच्या ‘लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत जिल्ह्यातील साडेदहा लाखांहून अधिक महिला पात्र असताना डिसेंबर महिन्यात तब्बल १ लाख ८ हजार ९६ महिलांना मासिक हप्ता मिळाला नसल्याचे समोर आले आहे. अचानक लाभ थांबल्याने जिल्हाभरात महिलांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मात्र, या लाभार्थ्यांचा हप्ता थांबण्यामागे ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान झालेल्या तांत्रिक चुका कारणीभूत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या ‘लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर दरमहा १५०० रुपये जमा केले जातात. मात्र, नंतर शासनाने उत्पन्न मर्यादा, घरात चारचाकी वाहन असणे आदी अटी लागू केल्याने काही महिलांचे नाव यादीतून वगळण्यात आले. त्यातच ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडल्यामुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थी तात्पुरते अपात्र ठरले आहेत.

ई-केवायसीतील चुका ठरल्या कारणीभूत

ई-केवायसीसाठी ऑनलाइन पोर्टल व मोबाईल लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, अनेक महिलांनी फॉर्म भरताना वय, लिंग, पात्रतेसंबंधी प्रश्नांना चुकीची उत्तरे दिल्याने त्यांचा हप्ता थांबला आहे.

तात्पुरत्या अपात्र ठरलेल्या लाभार्थी संख्या

६५ वर्षांपेक्षा अधिक वय दाखविलेल्या : १२,०७६ महिला

२१ वर्षांपेक्षा कमी वय निवडलेल्या : ४,०५६ महिला

ई-केवायसीतील इतर तांत्रिक चुका : ९१,०४२ महिला

पुरुष किंवा तृतीयपंथी पर्याय निवडलेले : ९२२ लाभार्थी

यामुळे एकूण १ लाख ८ हजारांहून अधिक महिलांचा डिसेंबरचा हप्ता रखडला आहे.

अंगणवाडी सेविकांकडून प्रत्यक्ष पडताळणी

लाभार्थ्यांच्या तक्रारी वाढल्यानंतर शासनाने दिलासा देणारा निर्णय घेतला असून, आता अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष पडताळणी करून ई-केवायसी दुरुस्त केली जाणार आहे. पडताळणीनंतर सुधारित माहिती शासनाकडे सादर केली जाणार असून, त्यानंतर लाभ पुन्हा सुरू केला जाणार आहे.

“जिल्ह्यात ‘लाडकी बहिण’ योजनेसाठी सुमारे १० लाख ५० हजारांहून अधिक महिला पात्र आहेत. मात्र ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडल्यामुळे १ लाख ८ हजार ९६ महिलांचा लाभ तात्पुरता थांबला आहे. या सर्व प्रकरणांची अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष पडताळणी केली जाईल. योग्य माहिती भरल्यानंतर लाभ पुन्हा सुरू केला जाईल.”

— आर. आर. तडवी, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, जळगाव

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add