Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»ग्राहक बनून आला आणि सोनं लंपास करणाऱ्या चोरट्याला अटक;

जळगाव

ग्राहक बनून आला आणि सोनं लंपास करणाऱ्या चोरट्याला अटक;

Editorial DeskBy Editorial DeskJanuary 26, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई !

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील ‘रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स’ मध्ये ग्राहक बनून सोन्याची चेन लंपास करणाऱ्या एका सराईत आंतरराज्यीय आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने तेलंगणा राज्यातून अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीच्या सोन्यापासून बनवलेली सोन्याची लगड देखील हस्तगत केली असून, आरोपीला पुढील कारवाईसाठी शनिपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

सुभाष चौकातील नयनतारा अँड सन्स (आर.सी. बाफना ज्वेलर्स) मध्ये एक अज्ञात इसम सोन्याची चेन खरेदी करण्याच्या बहाण्याने आला होता. त्याने सेल्समनला बोलण्यात गुंतवून १९.३५० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन २ लाख ४९ हजार अत्यंत शिताफीने चोरून नेली होती. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपी तेलंगणा राज्यातील सायबरबाद परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. एलसीबीच्या पथकाने तत्काळ तेलंगणा गाठून भास्कर किसन बानोथ (वय २२ वर्षे, रा. नगाई पल्ली तांडा, जि. यदाद्री भुवनागिरी, तेलंगणा) याला ताब्यात घेतले.

ओळख पटू नये म्हणून सोन्याची लगड पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता, त्याने चोरीची कबुली दिली. चोरीचा माल खपवताना आपली ओळख पटू नये आणि पुरावा नष्ट व्हावा या उद्देशाने त्याने चोरलेली सोन्याची साखळी वितळवून त्याची सोन्याची वीट बनवली होती. पोलिसांनी त्याच्याकडून ही लगड जप्त केली असून गुन्ह्याचा शंभर टक्के मुद्देमाल मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.

यशस्वी पथक ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र वल्टे, आणि कर्मचारी प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, सिद्धेश्वर डापकर व महेश सोमवंशी यांनी केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add