Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»३५ वर्षे कर्तव्य, शिस्त आणि प्रामाणिकपणा :

ताज्या बातम्या

३५ वर्षे कर्तव्य, शिस्त आणि प्रामाणिकपणा :

Editorial DeskBy Editorial DeskJanuary 26, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगावच्या पोलीस उपनिरीक्षक संजय शेलार यांना राष्ट्रपती पोलीस पदक

जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून रामानंद नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक संजय एकनाथ शेलार यांना २०२६ सालचे प्रतिष्ठित ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले आहे. त्यांच्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ, निष्ठावान आणि निष्कलंक सेवेचा हा सन्मान मानला जात आहे.

पोलीस दलातील शिस्त, प्रामाणिकपणा आणि समर्पणाचे आदर्श उदाहरण म्हणून संजय शेलार यांची ओळख आहे. त्यांनी आपल्या सेवाकाळात तब्बल ३५ वर्षे अखंडपणे कर्तव्य बजावले असून, या कालावधीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना २४२ बक्षिसे मिळाली आहेत. विशेष म्हणजे, संपूर्ण सेवाकाळात त्यांना एकदाही शिक्षा, दंड अथवा ताकीद देण्यात आलेली नाही. त्यांचा सर्व्हिस रेकॉर्ड पूर्णपणे स्वच्छ आणि अनुकरणीय आहे.

कर्तव्यनिष्ठेचा आणखी एक विशेष पैलू म्हणजे, ३५ वर्षांच्या सेवेत त्यांनी कधीही आजारपणाची रजा घेतलेली नाही. कामावरील निष्ठा, शिस्तप्रिय जीवनशैली आणि जबाबदारीची जाणीव यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व अधोरेखित होते.

या उल्लेखनीय सेवेची दखल घेत भारत सरकारने प्रजासत्ताक दिन २०२६ च्या निमित्ताने त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. या गौरवामुळे जळगाव जिल्हा पोलीस दलात आनंदाचे वातावरण पसरले असून वरिष्ठ अधिकारी, सहकारी आणि नागरिकांकडून संजय शेलार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add