Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»शिकवणीला जाणाऱ्या दोन मुलींचे मृतदेह विहिरीत आढळले

ताज्या बातम्या

शिकवणीला जाणाऱ्या दोन मुलींचे मृतदेह विहिरीत आढळले

Editorial DeskBy Editorial DeskJanuary 27, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

विहिरीत मुली आढळून आल्यानंतर परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली

जळगाव । भुसावळ तालुक्यातील साकरी येथे शिकवणीला जाणाऱ्या २ अल्पवयीन मुलींचा मृतदेह विहिरीत आढळून आले. गावालगत असलेल्या विहिरीत मुली आढळून आल्यानंतर परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेमागील कारणांचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात असून याप्रकरणी एका संशयित मुलाला ताब्यात घेतलं आहे.

काय आहे घटना?
भुसावळ तालुक्यातील साकरी येथील दोन्ही अल्पवयीन मुली जनता विद्यालयात इयत्ता 9 वीत शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.दरम्यान, दोन्ही अल्पवयीन मुली नेहमीप्रमाणे सकाळी घरातून शिकवणीसाठी निघाल्या होत्या. मात्र, बराच वेळ उलटूनही त्या घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोधादरम्यान गावालगत असलेल्या सोपान फेगडे यांच्या शेतीतील विहिरीत दोन्ही मुलींचे मृतदेह पाण्यात आढळून आल्या.

घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुक्यातील पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा आणि पुढील तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दोन्ही मुलींचा मृत्यू नेमका कसा झाला, अपघात की अन्य कोणते कारण आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान या घटनेप्रकरणी रोहन नरेंद्र चौधरी (20, साकरी) या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून या दोघींच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add