
ब्रेकिंग न्यूज: राज्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्रावर शोककळा !
बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून राजकीय वर्तुळासह सर्वत्र मोठी शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार हे मुंबईहून एका नियोजित कार्यक्रमासाठी बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती विमानतळावर विमान उतरत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला. वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण सुटल्याने विमान धावपट्टीवर प्रचंड वेगाने आदळले. हा अपघात इतका भीषण होता की, विमानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
सहा जणांचा मृत्यू
प्राथमिक अहवालानुसार, या विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे काही सहकारी आणि कर्मचारी होते. या दुर्दैवी घटनेत विमानातील सर्व सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तांत्रिक बिघाड हेच अपघाताचे मुख्य कारण असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
मदतकार्य सुरू
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. संपूर्ण विमानतळ परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून बचावकार्य पूर्ण करण्यात आले आहे.
राज्यावर शोककळा
अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच बारामतीसह संपूर्ण राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. राज्याच्या राजकारणातील एका मोठ्या नेतृत्वाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.


