Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»रावेरमध्ये पशुधन चोरट्यांचा पर्दाफाश! ४० हजारांची गाय चोरणारे तिघे जेरबंद!

क्राईम

रावेरमध्ये पशुधन चोरट्यांचा पर्दाफाश! ४० हजारांची गाय चोरणारे तिघे जेरबंद!

Editorial DeskBy Editorial DeskOctober 30, 2026Updated:October 30, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

रावेर प्रतिनिधी  | रावेर तालुक्यात पशुधन चोरट्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शेतकऱ्याच्या गोठ्यातून तब्बल ४० हजार रुपये किमतीची गाय चोरणाऱ्या तीन जणांच्या टोळीला रावेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे परिसरातील पशुपालकांना दिलासा मिळाला आहे.

रावेर तालुक्यातील शिंदखेडा येथील संतोष देविदास पाटील हे शेतीसोबत दुग्धव्यवसाय करतात. २८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री त्यांच्या गोठ्यात बांधलेल्या गुरांचा आवाज आल्याने ते पाहण्यासाठी गेले. मात्र, गोठ्यातील एक गाय गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्यांनी सुमारे ४० हजार रुपये किमतीची गाय चोरून नेल्याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. पोलिसांनी गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे तीन संशयितांना ताब्यात घेतले. शेख मुस्ताक शेख इसाक (३८), शेख अक्रम शेख असलम (२५) आणि शेख समीर शेख कलीम (२६) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी गाय चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

भोकरच्या SBI बँकेवर दरोडा! चादर विक्रीच्या बहाण्याने रेकी, पोलिसांचा पाठलाग अन् चावलखेड्यातून तीन संशयित जेरबंद!

October 31, 2026

किनगाव घटनेवरून काँग्रेस आक्रमक; लाठीचार्ज पोलिसांनीच केल्याचा जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी यांचा गंभीर आरोप!

October 31, 2026

अवैध वाळू वाहतुक करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

October 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add