Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»जामनेर तालुक्यात विवाहित महिलेवर अत्याचार, सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा

ताज्या बातम्या

जामनेर तालुक्यात विवाहित महिलेवर अत्याचार, सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraJanuary 29, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

अत्याचार केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर – येथील जामनेर पोलीस ठाण्यात विवाहित महिलेवर शारीरिक व मानसिक अत्याचार केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर ३४/२०२६ नुसार भारतीय दंड विधान कलम ८५, ११५(२), ३५२, ३५१(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही नोंद २८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.०२ वाजता करण्यात आली आहे.
फिर्यादी महिला (वय ३६, व्यवसाय – घरकाम) रा. लोहारा, ता. पाचोरा (सध्या रा. सावरला, ता. जामनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, ४ ऑक्टोबर २०२५ पासून वेळोवेळी आरोपींनी संगनमताने त्यांना शिवीगाळ करून चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच शारीरिक व मानसिक त्रास देत गांजपाठ केला. यावेळी जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये पती, सासरे, सासू व नणंद यांचा समावेश आहे. सदर प्रकार फिर्यादीच्या सासरी लोहारा (ता. पाचोरा) तसेच माहेरी सारगाव (ता. जामनेर) येथे घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या गुन्ह्याचा तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड हे करीत असून, सध्या कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add