Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»खाटुश्याम दर्शनाला जाणाऱ्या प्लॅन करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देणारी बातमी

जळगाव

खाटुश्याम दर्शनाला जाणाऱ्या प्लॅन करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देणारी बातमी

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraJanuary 30, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

साईनगर शिर्डी–बिकानेर विशेष रेल्वेला मुदतवाढ

जळगाव । शिर्डीवाले साईबाबा आणि खाटुश्याम दर्शनाला जाणाऱ्या प्लॅन करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देणारी बातमी आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने साईनगर शिर्डी–बिकानेर साप्ताहिक विशेष रेल्वे सेवेच्या संचालन कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वे सेवा एक मार्च २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

गाडी क्रमांक 04716 साईनगर शिर्डी – बीकानेर साप्ताहिक विशेष रेल्वे ही पूर्वी अधिसूचित 1 फेब्रुवारीपर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित करण्यात आली. मात्र ही गाडी आता 1 मार्चपर्यंत धावणार आहे. तर गाडी क्रमांक 04715 बिकानेर-साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष रेल्वे ही पूर्वी अधिसूचित 31 जानेवारीपर्यंत धावणार होती मात्र ती आता 28 फेब्रुवारीपर्यंत धावेल.

या स्थानकांवर असेल थांबा
या गाडीला मनमाड, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, नागदा, शामगढ, रामगंज मंडी, कोटा, सवाई माधोपूर, दुर्गापुरा, जयपूर, ढेहर का बालाजी, रिंगस, सीकर, लक्ष्मणगढ, फतेहपूर शेखावाटी, चूरू, रतनगढ, राजलदेसर आणि श्री डूंगरगढ स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

शिर्डी हे देशातील एक प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्र असून, दरवर्षी लाखो भाविक येथे साई दर्शनासाठी येतात. तसेच राज्यस्थानमधील खाटुश्यामला जाण्यासाठी रिंगस हे रेल्वे स्टेशन जवळ पडते. या दोन्ही देवस्थान ठिकाणी जाण्यासाठी शिर्डी-बिकानेर ही साप्ताहिक गाडी सोयीची ठरत आहे. सध्या या गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून मागणी लक्ष्यात घेऊन या गाडीच्या सेवेला मुदतवाढ देण्यात आलीय.

विशेष म्हणजे, मुदतवाढ देताना या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात, थांब्यांमध्ये तसेच डब्यांच्या संरचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे आधीच आरक्षण केलेले प्रवासी, तसेच भविष्यातील प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांना कोणताही संभ्रम राहणार नाही. नियमित वेळापत्रकानुसारच या गाड्या धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add