Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»जळगाव विभाग,भूसंपादनाच्या नावाखाली १६.९७ लाखांचा घोटाळा;

जळगाव

जळगाव विभाग,भूसंपादनाच्या नावाखाली १६.९७ लाखांचा घोटाळा;

Editorial DeskBy Editorial DeskJanuary 31, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

खोटी मालकी दाखवणारी महिला पोलिसांच्या ताब्यात

जळगाव : भूसंपादन विभाग, जळगाव यांच्या कडील भूसंपादीत जागेची मालक असल्याचे खोटे भासवून शासनाकडून तब्बल १६ लाख ९७ हजार ३२६ रुपयांचा मोबदला बँक खात्यात घेत शासनाची फसवणूक करणाऱ्या महिलेला जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील आरोपी सुनंदा मोतीलाल पाटील (वय ५९, रा. ज्ञानेश्वर नगर, देवळाली पाथर्डी रोड, नाशिक) हिने मौजे नशिराबाद, तालुका जळगाव येथील गट क्रमांक २२०६ मधील प्लॉट क्रमांक ३ व ४ हे स्वतःचे असल्याचे भासवले. प्रत्यक्षात हे प्लॉट श्रीमती पुष्पा देवराम जावळे (वय ७०, रा. गणेश कॉलनी, जळगाव) यांच्या मालकीचे आहेत. सन २०११ मध्ये भूसंपादन निवाडा क्रमांक २४ व २५/२०११ नुसार १५० चौ. मी. तसेच सन २०१३ मध्ये भूसंपादन निवाडा क्रमांक ०६/२०१३ नुसार ३३८ चौ. मी., असे एकूण ४८८ चौ. मी. क्षेत्र भारतीय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या चौपदरीकरणासाठी भूसंपादन करण्यात आले होते. या भूसंपादनाच्या मोबदल्यापोटी दिनांक २१ ऑगस्ट २०१८ ते २३ ऑगस्ट २०१८ या कालावधीत १६,९७,३२६ रुपये मिळवण्यासाठी आरोपीने खोटे कागदपत्र सादर करत स्वतःचे नाव पुष्पा देवराम जावळे असल्याचे दाखवले व आरटीजीएसद्वारे ही रक्कम बँक खात्यात घेतली. तपासादरम्यान आरोपीने खोट्या ओळखीवर बँक खाते उघडून रक्कम घेतल्याचे स्पष्ट झाले. बँकेकडील कागदपत्रे, फिर्यादीकडील कार्यालयीन नोंदी व छायाचित्रांच्या आधारे तसेच गोपनीय माहितीच्या मदतीने आरोपीची ओळख पटवून तिला अटक करण्यात आली.

आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिची पाच दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत असून, ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे व जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add