
जिल्हा प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे.
भुसावळ प्रतिनिधी : शिंदी (ता. भुसावळ): किन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका चालकाच्या अनुपस्थितीमुळे शिंदी येथील गरोदर महिलेचा जीव धोक्यात आला. सामाजिक कार्यकर्ते किरण जाधव यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे.दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी रविवारी दुपारी २ ते ३ वाजता शिंदी येथील महक अलताफशहा या महिलेला प्रसववेदना सुरू झाल्या. तिच्या नातेवाईकांनी किन्ही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिका चालक झाकिर नजीर दरवेशी यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्याने बाहेरगावी मुलगी बघायला गेल्याचे सांगून येणार नसल्याचे उत्तर दिले.
नातेवाईकांनी सामाजिक कार्यकर्ते किरण जाधव यांच्याशी संपर्क साधला. जाधव यांनी केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलले, असा त्यांनी सांगितले की, चालक बाहेरगावी गेला असून पर्यायी ड्रायव्हर नाही. ‘पर्यायी व्यवस्था स्वतः करा,’ असे म्हणाले.आरोग्य सेवेची दुर्दैवी स्थितीग्रामीण भागात २४ तास रुग्णवाहिका सेवा आवश्यक आहे. चालक सुट्टीवर असल्यास पर्यायी चालकाची व्यवस्था असावी, अशी अपेक्षा आहे. मात्र, किन्ही केंद्रात अशी व्यवस्था नसल्याने गरोदर महिलेच्या जीवाला धोका निर्माण झाला. जाधव यांनी खाजगी चारचाकी वाहनाने तिला जिल्हा रुग्णालयात नेले, ज्यामुळे ती सुखरूप पोहोचली.केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मात्र नंतर विचारपूसही केली नाही. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सूचित केल्यावरही त्यांनी टाळाटाळ केली.
‘ग्रामीण महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतेय,’ असे जाधव म्हणाले.कारवाईची मागणीकिरण जाधव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून रुग्णवाहिका सेवेत सुधारणा व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. ‘अशा घटना पुन्हा घडू नयेत, अन्यथा रुग्णांच्या मृत्यूचे कारण बनेल,’ असा इशाराही त्यांनी दिला.


