Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»शेगांव येथील संत श्री गजानन महाराज यांच्या १४७ व्या प्रकट दिनानिमित्त आयोजन

ताज्या बातम्या

शेगांव येथील संत श्री गजानन महाराज यांच्या १४७ व्या प्रकट दिनानिमित्त आयोजन

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 3, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

संत श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन,भुमिपुजन सोहळा

जामनेर प्रतिनिधी : शेगांव येथील संत श्री गजानन महाराज यांच्या १४७ व्या प्रकट दिनानिमित्त शेंदुर्णीत श्री.संत गजानन महाराज भक्त परिवार यांच्या वतीने दि.४ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.४ फेब्रुवारी बुधवार रोजी सकाळी ११ वा नियोजित संत श्री गजानन महाराज मंदिर भुमिपुजन सोहळा संत महंत व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.गुरुवार दि.५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता संत श्री गजानन महाराज यांचा अभिषेक व पुजा होईल.शुक्रवार दि.६ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता संत श्री गजानन महाराज महिला भक्त मंडळ शेंदुर्णी यांची भजन संध्या संपन्न होणार आहे.

दि.७ फेब्रुवारी शनिवारी रात्री ८ वाजता संत श्री गजानन महाराज यांची बावन्नी व आरती व महिला भजनी मंडळ यांची भजन संध्या होणार आहे.रविवार दि.८ फेब्रुवारी रोजी प्रकट दिनानिमित्त सकाळी ९ वाजता संत श्री गजानन महाराज चौकातुन पादुका,प्रतिमेची भव्य पालखी मिरवणुक निघणार असुन यासाठी वारकरी संप्रदाय भजनी मंडळ व हरिपाठ महिला भजनी मंडळ यांची साथ संगत लाभणार आहे.

महाप्रसादाचे आयोजन..

संध्याकाळी ६ वाजेपासुन नियोजित संत श्री गजानन महाराज यांच्या मंदिरात भव्य प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या सोहळ्यात भाविकांनी सहभागी होऊन अन्नदानासाठी आर्थिक मदत करावी तसेच गहु ,तांदुळ,तेल,बेसन इत्यादी साहित्य ज्यांना द्यावयाचे असेल त्यांनी नियोजित संत श्री गजानन महाराज यांच्या मंदिरात संपर्क साधावा असे आवाहन आयोजक संत श्री गजानन महाराज भक्त परिवार शेंदुर्णी यांचे वतीने करण्यात आले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add