Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी !

ताज्या बातम्या

एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी !

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 3, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद;

जळगाव शहरात बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या आंतरराज्य घरफोडी टोळीला एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत मध्यप्रदेशातील दोन सराईत आरोपींसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून चोरीस गेलेले १९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

जळगाव शहरातील आयोध्या नगर भागात राहणारे फिर्यादी पंढरीनाथ पाटील हे कुटुंबासह गावी धानवड येथे गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घरात घरफोडी केली. शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिल्यानंतर पाटील यांनी घरी येऊन पाहणी केली असता लाकडी कपाट फोडलेले व त्यातील सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे आढळून आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७९/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे पोउनि राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोहेकॉ किरण चौधरी, पोकॉ विशाल कोळी यांचे विशेष पथक नेमण्यात आले. पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढत थेट मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील पुनासा तालुक्यातील इनपुन पुनर्विकास परिसरात सापळा रचला. दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलिसांनी शिताफीने आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी घरफोडी केल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सुखदेव रामसिंग टाक (वय ३६) व आकाश दिनेश वाघे (वय १९) (रा. इनपुन पुनर्विकास, ता. पुनासा, जि. खंडवा, मध्यप्रदेश) अशी असून त्यांच्यासोबत एक विधीसंघर्षग्रस्त बालकही सहभागी होता.

आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने, गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले सुमारे ४ लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन, तसेच लोखंडी पकड (पेंचिस), स्क्रू-ड्रायव्हर व चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ किरण चौधरी व पोकॉ योगेश घुगे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add