Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»अमळनेर येथे अस्थिकलश दर्शन व पाडळसरे धरणात अस्थि विसर्जन

ताज्या बातम्या

अमळनेर येथे अस्थिकलश दर्शन व पाडळसरे धरणात अस्थि विसर्जन

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 4, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थिकलश दर्शन

अमळनेर प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थिकलश दर्शन व अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम मंगळवार, ३ फेब्रुवारी रोजी अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला. अजितदादा यांचे अस्थी कलश दुपारी ३ ते ४ या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, अमळनेर येथे भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी नागरिकांनी व पक्ष कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.

यानंतर अस्थिकलशाची रथयात्रा अमळनेर–धार–मारवड–कळमसरे–पाडळसरे मार्गे काढण्यात आली. या रथयात्रेदरम्यान मार्गावरील गावांमध्ये नागरिकांनी पुष्पवृष्टी करत स्व. अजितदादा पवार यांना अखेरचा निरोप दिला. संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण दिसून येत होते.

पाडळसरे धरण येथे आमदार तथा माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते विधीवत अस्थि विसर्जन करण्यात आले. यावेळी स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याची, समाजासाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून देत उपस्थितांनी त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. “दादांच्या स्मृती, कार्य आणि विचार सदैव आमच्या हृदयात अढळ राहतील,” अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. या प्रसंगी प्रदेश प्रवक्ता प्रतिभा शिंदे, जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार, रावेर जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व असंख्य समर्थक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शांतता, शिस्त आणि श्रद्धेच्या वातावरणात पार पडला.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add