Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»सायकलवारीने आरोग्य भावी महापौर दीपमाला काळेंचा संदेश

जळगाव

सायकलवारीने आरोग्य भावी महापौर दीपमाला काळेंचा संदेश

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 4, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

दीपमाला काळे यांनी जळगाव सायकलिस्ट ग्रुपच्या सदस्यांसह जळगाव ते पद्मालय असा सायकल प्रवास करत गणरायाचे दर्शन घेतले.

जळगाव प्रतिनिधी :- शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ मधून बिनविरोध निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेविका दीपमाला काळे यांची महापौर पदी निवड निश्चित झाली आहे. महायुतीच्या वतीने त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले असून, केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. या पार्श्वभूमीवर, आज मंगळवार ३ फेब्रुवारी रोजी दीपमाला काळे यांनी जळगाव सायकलिस्ट ग्रुपच्या सदस्यांसह जळगाव ते पद्मालय असा सायकल प्रवास करत गणरायाचे दर्शन घेतले.

दीपमाला काळे यांना सायकलिंगची प्रचंड आवड असून त्या आपल्या फिटनेसबाबत अत्यंत जागरूक असतात. महापौर पदाची मोठी जबाबदारी खांद्यावर येण्यापूर्वी त्यांनी ‘आरोग्यम् धनसंपदा’ असा संदेश देत सायकलने पद्मालय गाठले. यावेळी त्यांच्यासोबत जळगाव सायकलिस्ट ग्रुपचे महिला व पुरुष सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पद्मालय येथील गणपती मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनसेवेसाठी आपल्याला बळ मिळावे, असे साकडे गणरायाला घातले. यावेळी जळगाव सायकलिस्ट ग्रुपच्या वतीने दीपमाला काळे यांची महापौर पदी निवड निश्चित झाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

६ तारखेला होणार अधिकृत घोषणा
महापौर पदासाठी महायुतीकडून केवळ दीपमाला काळे यांचाच अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले आहे. या निवड प्रक्रियेची अधिकृत घोषणा येत्या ६ तारखेला होणार असून, जळगावला एक ‘फिट’ आणि कार्यक्षम महापौर मिळणार असल्याची भावना सायकलिस्ट ग्रुपच्या सदस्यांनी व्यक्त केली.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add