Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»श्री गजानन महाराज सेवाभावी संस्थेतर्फे श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त कार्यक्रम.

ताज्या बातम्या

श्री गजानन महाराज सेवाभावी संस्थेतर्फे श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त कार्यक्रम.

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 6, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

यावल येथे सेवाभावी संस्थेतर्फे जय्यत तयारी.

यावल प्रतिनिधी : येथील श्री गजानन महाराज सेवाभावी संस्थेतर्फे श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त रविवार दि.८ फेब्रुवारी २०२६ रोजी विविध कार्यक्रमांची जय्यत तयारी करण्यात आली आहे.दि. ८ रोजी सकाळी ६ वाजता श्री च्या मूर्तीचा अभिषेक व आरती, ७ वाजता लघु श्री विष्णू याग, ८ वाजता यावल शहरातील श्री रेणुका देवी मंदिरापासून श्री गजानन महाराजांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक विरारनगर मधील श्री गजानन महाराज मंदिर पर्यंत काढली जाईल.

दुपारी १२ वाजता श्री विष्णू यागाची पूर्णाहुती व महाआरती,नंतर १२ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप,दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत श्री तारकेश्वर महादेव भजनी मंडळ यावल यांचा भजनाचा कार्यक्रम, रात्री ७ वाजता श्री ची आरती व रात्री ८ वाजता ह.भ.प. राजेंद्र अंबिकार (रा.केकत निंभोरे तालुका जामनेर ) यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल. तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा तसेच कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करीत दि. ८ रोजी महाप्रसादासाठी ज्या भाविकांना देणगी अथवा ११ , २१ , ५१ पोळ्या ( चपात्या ) किंवा भाकरी द्यावयाच्या असतील त्यांनी रविवार दि. ८ रोजी विरार नगर मधील श्री गजानन महाराज मंदिर येथे येथे दुपारी तीन वाजेपर्यंत आणाव्या अशी विनंती श्री गजानन महाराज सेवाभावी संस्थेतर्फे करण्यात आली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add