Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»आरटीओ कार्यालयात बनावट कागदपत्र घेऊन वाहनाचे बेकायदेशीर हस्तांतरण केल्याचा धक्कादायक प्रकार

ताज्या बातम्या

आरटीओ कार्यालयात बनावट कागदपत्र घेऊन वाहनाचे बेकायदेशीर हस्तांतरण केल्याचा धक्कादायक प्रकार

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 6, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

बनावट आधार व पॅनकार्डच्या आधारे आरटीओची फसवणूक; गुन्हा दाखल !

जळगाव प्रतिनिधी – आरटीओ कार्यालयात बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन वाहनाचे बेकायदेशीर हस्तांतरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मूळ मालकाच्या जागी चक्क एक ‘डमी’ व्यक्ती उभी करून शासनाची आणि प्रशासनाची दिशाभूल करण्यात आली. याप्रकरणी जळगावच्या रामानंद नगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, जळगाव शहरातील नवनाथ नगर येथील रहिवासी दीपक शिवाजीराव ठाकरे (वय ४६) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. ठाकरे यांच्या मालकीचे वाहन (क्रमांक MH 19 EJ 8055) जळगाव आरटीओ कार्यालयात हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेत हा मोठा गैरप्रकार झाला. संशयित आरोपींनी अत्यंत नियोजनबद्ध रितीने ठाकरे यांच्या नावे बनावट आधार कार्ड आणि पॅनकार्ड तयार केले. इतकेच नाही तर, आरटीओच्या कार्यालयासमोर एका अनोळखी व्यक्तीला ‘दीपक ठाकरे’ म्हणून उभे केले.

या डमी व्यक्तीने मूळ मालक असल्याचे भासवून कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या आणि त्या वरिष्ठ लिपिकांकडून साक्षांकित देखील करून घेतल्या.केवळ कागदपत्रेच नव्हे, तर आरोपींनी डिजिटल यंत्रणेतही हस्तक्षेप केल्याचे समोर आले आहे. वाहनाशी संबंधित मोबाईल क्रमांक ऑनलाईन पोर्टलवर परस्पर बदलण्यात आला. तसेच, बँकेचे कर्ज असतानाही बनावट ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ तयार करून आरटीओला सादर करण्यात आले. या सर्व प्रक्रियेमुळे मूळ मालकाला कोणतीही माहिती न मिळता वाहनाचे हस्तांतरण पूर्ण करण्यात आले.

या गुन्ह्यात शिवलाल ब्रिजलाल पाटील (रा. मुक्ताईनगर), अक्षय सोनवणे (रा. जळगाव) आणि एका अज्ञात इसमाचा समावेश आहे. या तिघांनी संगनमत करून फसवणूक केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. रामानंद नगर पोलिसांनी याप्रकरणी भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add