Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»प्रशांत पाटील चौकात झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हत्येत झाले

जळगाव

प्रशांत पाटील चौकात झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हत्येत झाले

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 7, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

किरकोळ वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या ; नातेवाईकांचा आक्रोश

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील प्रशांत पाटील चौकात झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हत्येत झाले आहे. अवघ्या २१ वर्षांच्या शुभम गजानन सपकाळे या तरुणाला चौघांनी लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली होती. या गंभीर मारहाणीत जखमी झालेल्या शुभमचा मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवारी ५ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.

या घटनेमुळे पिंप्राळा परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून संताप व्यक्त केला जात आहे.

मयत शुभम सपकाळे (रा. प्रबुद्ध नगर, पिंप्राळा) हा प्रशांत पाटील चौकात असताना संशयित आरोपी विशाल भिका सोनवणे, चंद्रकांत उर्फ बाळा शांताराम कोळी, यश प्रदीप पाटील उर्फ बाँड आणि धीरज कोळी (सर्व रा. पिंप्राळा) यांनी त्याला गाठले. कोणत्याही ठोस कारणाशिवाय या चौघांनी शुभमला लाठ्या-काठ्यांनी आणि लाथा-बुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केली. या हल्ल्यात शुभमच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली होती.

उपचारादरम्यान मृत्यू आणि कायदेशीर कारवाई:
शुभमची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला तातडीने मुंबई येथे हलवण्यात आले होते. मात्र, चार दिवसांच्या झुंजीनंतर त्याची प्राणज्योत मालविली. या घटनेनंतर रामानंदनगर पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून आधी दाखल असलेल्या गुन्ह्यात आता ‘खूनाचा’ आणि ‘ॲट्रॉसिटी’ कायद्यांतर्गत कलमांची वाढ केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चंद्रकांत कोळी (वय १८) आणि यश पाटील (वय १९) या दोघांना अटक केली असून, उर्वरित दोन आरोपी अद्याप फरार आहेत.

परिसरात पोलीसांचा चोख बंदोबस्त :
शुक्रवारी ६ फेब्रुवारी सायंकाळी शुभमचा मृतदेह मुंबईहून जळगावात आणण्यात आला. यावेळी पिंप्राळा परिसरात वातावरण अत्यंत तणावपूर्ण होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पिंप्राळा आणि शुभमच्या निवासस्थानी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एका तरुण मुलाचा अशा प्रकारे अंत झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add