Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»जळगाव जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 7, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी लाक्षणिक संप पुकारण्यात आला

जळगाव प्रतिनिधी । अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी लाक्षणिक संप पुकारण्यात आला असून, जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या चार श्रम संहितांविरोधात आणि विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी हा संप व आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मध्यवर्ती सरकारने कामगार व कर्मचारी हिताचे कायदे रद्द करून चार श्रम संहिता लागू केल्या असून, या संहिता कामगारविरोधी असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या श्रम संहिता रद्द कराव्यात तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्या तातडीने मंजूर कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी समन्वय समितीने १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी लाक्षणिक संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजन मंत्री, महिला व बालविकास मंत्री यांच्यासह महिला व बालविकास विभागाचे सचिव आणि नवी मुंबई येथील एबाविसे योजनेचे आयुक्त यांना निवेदन देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतन व भत्ते लागू करावेत, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटी द्यावी तसेच गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सेविका व मदतनीसांना अनुक्रमे २४,८०० व २०,४०० रुपये वेतन लागू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता रद्द करून तो मानधनात समाविष्ट करावा, योजना कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा व मासिक पेन्शन लागू करावी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कामाचा थकीत मोबदला तातडीने अदा करावा आणि योजनाबाह्य कामे अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून करून घेऊ नयेत, अशी मागणी करण्यात आली आहे. दरवर्षी एक महिना उन्हाळी सुट्टी, भरपगारी आजार रजा, एफआरएसमधील तांत्रिक अडचणी दूर करणे तसेच पोषण ट्रॅकरच्या कामासाठी ५जी मोबाईल व वार्षिक मोबाईल रिचार्ज भत्ता देण्याचीही मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे.

या सर्व मागण्यांसाठी १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या देशव्यापी लाक्षणिक संपात राज्यासह जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी शंभर टक्के सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संपाच्या दिवशी कोणतेही दैनंदिन काम न करता अंगणवाडी केंद्र बंद ठेवावे तसेच पोषण ट्रॅकर सुरू करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.संपाच्या पार्श्वभूमीवर १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता जळगाव जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असून, सेविका व मदतनीसांनी गणवेश परिधान करून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रामकृष्ण बी. पाटील यांच्यासह जिल्ह्यातील प्रकल्प प्रमुख व बिट प्रमुखांनी केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add