Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»जिल्ह्यात समता सैनिक दलाची दमदार ताकद उभी

जळगाव

जिल्ह्यात समता सैनिक दलाची दमदार ताकद उभी

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 7, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

पूर्व व पश्चिम अशा दोन जिल्हा कार्यकारिणींची घोषणा : सचिवपदी जंजाळे तर मुख्य संघटकपदी संदानशिव

विश्वभूषण विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन

जळगाव : विश्वभूषण विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाच्या जळगाव जिल्हास्तरीय बैठकीत संघटन बळकट करण्याच्या दिशेने मोठा निर्णय घेण्यात आला असून जिल्ह्यात पूर्व आणि पश्चिम अशा दोन स्वतंत्र जिल्हा कार्यकारिणी स्थापन करण्यात आल्या. ५ फेब्रुवारी रोजी पार पडलेली ही बैठक राज्याध्यक्ष मा. धर्मभूषण बागुल यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली.

या बैठकीला जिल्ह्यातील १५ पैकी १३ तालुक्यांमधील कार्यकर्त्यांची भक्कम उपस्थिती होती. विशेष म्हणजे महिला कार्यकर्त्यांचाही मोठा सहभाग दिसून आला. बैठकीत समता सैनिक दलाची ऐतिहासिक वाटचाल, संघर्षशील परंपरा, शिस्त आणि तत्वनिष्ठ भूमिका यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी ठामपणे सांगितले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व भारतीयांवर अमूल्य उपकार आहेत, हे सर्वजण मान्य करतात; मात्र त्यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलात सामील होण्याबाबत उदासीनता का? असा थेट सवाल उपस्थित करून कार्यकर्त्यांना संघटन विस्तारासाठी सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले.

देशातील सध्याची सामाजिक व राजकीय परिस्थिती लक्षात घेता बाबासाहेबांचे विचार घराघरात आणि गावागावात पोहोचविण्याची जबाबदारी समता सैनिक दलाने घ्यावी, तसेच सर्व जाती-धर्मातील नागरिकांना संघटनेत सामावून घेण्यावर भर द्यावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. बैठकीचे आयोजन राज्य संघटक आयु. विजय निकम आणि जिल्हाध्यक्ष आयु. किशोर डोंगरे यांनी केले.

जळगाव जिल्हा पश्चिम कार्यकारिणी अध्यक्ष – किशोर डोंगरे (पाचोरा), उपाध्यक्ष – विलास शिंदे (जळगाव), सचिव – अनिल सोनवणे (भुसावळ), सहसचिव – वाल्मीक शिरसाठ (भडगाव), भाईदास गोलाईत (चाळीसगाव), प्रसिद्धीप्रमुख – अरुण खैरे (पाचोरा), संघटक – गोकुळ अहिरे (एरंडोल), सरलाबाई गायकवाड (पाचोरा), अभिमन्यू बाविस्कर (पाचोरा), संतोष भालेराव (अमळनेर), प्रचारक – अलकाताई मोरे (भडगाव), किरण रमेश शर्मा (जळगाव). जळगाव पूर्व जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष – संजय तायडे (बोदवड), उपाध्यक्ष – प्रमोद बावस्कर (भुसावळ), सचिव – मिलिंद जंजाळे (यावल), सहसचिव – शरद बाविस्कर (जामनेर), मुख्य संघटक – सुपडू सनदाशिव (यावल), संघटक – नितीन सुरवाडे (बोदवड), शालूताई भालेराव (चोपडा), प्रचारक – कलावती गायकवाड (यावल). याच बैठकीत यावल तालुका अध्यक्षपदी अशोक अडकमोल आणि सचिवपदी सतीश अडकमोल (मोहराळा) यांची निवड जाहीर करण्यात आली. या निवडीमुळे यावल तालुक्यात संघटनात्मक कामाला नवी गती मिळणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.समता सैनिक दलाच्या या नव्या संघटनात्मक बांधणीमुळे जळगाव जिल्ह्यात दलाची ताकद वाढणार असून, बाबासाहेबांचे विचार अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add