Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»अमळनेर तालुक्यातील एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यातील एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 7, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

मारवड पोलिसांत गुन्हा दाखल

अमळनेर प्रतिनिधी :  तालुक्यातील मारवड पोलीस स्टेशन अंतर्गत एका शिवारात एका २४ वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिला मध्य प्रदेशातील असून, तिला आमिष दाखवून तिच्या असहायतेचा फायदा घेत एका नराधमाने अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी ॲट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिला (वय २४ वर्षे) ही मूळची मध्य प्रदेशातील रहिवासी असून ती सध्या भिक्षा मागून उदरनिर्वाह करते. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास एका झोपडीत ती एकटी असताना, संशयित आरोपी आकीबखान गफ्फारखान (रा. अमळनेर) याने तिला गाठले. पीडित महिला ही तिथे एकटीच आहे, याची माहिती असतानाही आरोपीने तिला विविध आमिषे दाखवली. तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

पीडितेने या घटनेनंतर तात्काळ मारवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक बाजीराव कोते यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा तपास स्वतः एसडीपीओ विनायक कोते करत आहेत. त्यांच्यासोबत मारवड पोलीस ठाण्याचे सपोनि जिभाऊ तुकाराम पाटील हे तपासात सहकार्य करत आहेत. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, मात्र पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add