Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»सीझन ५ मध्ये गोदावरी कॉलेजच्या आकांक्षा डोंगरेची फायनलिस्ट म्हणून निवड

जळगाव

सीझन ५ मध्ये गोदावरी कॉलेजच्या आकांक्षा डोंगरेची फायनलिस्ट म्हणून निवड

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 10, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

अकोला येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘मिस प्राईड ऑफ महाराष्ट्र – सीझन ५’ या राज्यस्तरीय सौंदर्य व व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेत गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग

जळगाव ( प्रतिनिधी ) – अकोला येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘मिस प्राईड ऑफ महाराष्ट्र – सीझन ५’ या राज्यस्तरीय सौंदर्य व व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेत गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथील विद्यार्थिनी कु. आकांक्षा डोंगरे हिची मिस कॅटगरीमध्ये फायनलिस्ट म्हणून निवड झाली आहे.

कु. आकांक्षा डोंगरे सध्या बी.एससी. नर्सिंग (सातवा सेमिस्टर) मध्ये शिक्षण घेत असून, अभ्यासासोबतच तिने या स्पर्धेसाठी विशेष तयारी केली. शारीरिक तंदुरुस्ती, फिटनेस, व्यक्तिमत्त्व विकास आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी तिने नियमित सराव करत जिमचे प्रशिक्षण घेतले. सातत्यपूर्ण मेहनत, शिस्तबद्ध सराव आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर तिने राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. विशाखा गणवीर, प्रशासकीय अधिकारी प्रवीण कोल्हे, तसेच सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी कु. आकांक्षा डोंगरे हिचे मनःपूर्वक अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कु. आकांक्षा डोंगरेच्या या यशामुळे गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगावच्या नावलौकिकात भर पडली असून, महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणास्थान ठरली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add