
न्यजीव तस्करी प्रकरणात पाच आरोपी ताब्यात,दुर्मिळ ‘मांडूळ’ प्रजातीच्या सापाची तस्करीव
ब्रह्मपुरी वनविभाग अंतर्गत येणाऱ्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. रत्नापूर येथे ‘मांडूळ’ प्रजातीचे साप तस्करी करण्याच्या उदीशाने बाळगल्याचे आढळून आल्याने पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.उपवनसंरक्षक कुमारस्वामी (ब्रह्मपुरी) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. सहाय्यक वनसंरक्षक अरविंद जे (प्राणी व वन्यजीव) ब्रह्मपुरी, सहाय्यक वनसंरक्षक मेहेश गायकवाड (तेंदू) ब्रह्मपुरी, वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार (बोरावार) सिंदेवाही यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गस्तीदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रत्नापूर येथे धाड टाकली.
उपवनपरिक्षेत्र नवरगाव अंतर्गत तपासादरम्यान युवराज गहाणे (रा. रत्नापूर) यांच्या घरी प्लास्टिक पिशवीत मांडूळ प्रजातीचे साप आढळून आले. याप्रकरणी अशोक आत्राम (वय ५९, रा. रत्नापूर, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर), ईश्वर शेंडे (वय ५३, रा. धामणगाव, ता. नागभीड, जि. चंद्रपूर), निर्मल हालदार (वय ६०, रा. नेताजी नगर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली), सरोज मालो (वय ३८, रा. सुंदर नगर, ता. मुलचेरा, जि. गडचिरोली), अनिल मेश्राम (वय ३९, रा. रत्नापूर, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर) पाच आरोपी जेरबंद करण्यात आले.
प्रसंगी कलम ०९/११२/२२७७९४ अन्वये दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा नोंदवून सर्व आरोपींना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, सिंदेवाही न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या कारवाईत क्षेत्र सहाय्यक सिडाम (नवरगाव), क्षेत्र सहाय्यक नितीन गडपायले (सिंदेवाही), वनरक्षक राठोड, वनरक्षक चहांदे, वनरक्षक नागरे, वन कर्मचारी तसेच आर. आर. यू. पथकाने सहभाग घेतला. पुढील तपास सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.


