Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»महाराष्ट्र्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जळगाव शहर शाखेच्या नवीन कार्यकारिणीची निवड

जळगाव

महाराष्ट्र्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जळगाव शहर शाखेच्या नवीन कार्यकारिणीची निवड

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 12, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी,

जळगाव | येथील महाराष्ट्र्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जळगाव शहर शाखेच्या नवीन कार्यकारिणीची निवड एकमताने करण्यात आली आहे. यात शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी विश्वजीत चौधरी यांची निवड झाली. तर प्रधान सचिवपदी हेमंत रघुनाथ सोनवणे याची फेरनिवड करण्यात आली आहे.

जळगाव शहर शाखेची बैठक नुकतीच जिल्हा कार्यालयात घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शक म्हणून राज्याचे पदाधिकारी प्रा. डी. एस. कट्यारे तर निरीक्षक म्हणून राज्य पदाधिकारी विश्वजीत चौधरी उपस्थित होते. सुरुवातीला विविध उपक्रम घेण्याविषयी चर्चा झाली. यात राष्ट्रीय विज्ञान दिन, छत्रपती शिवाजी महाराज जयंती उपक्रम घेण्याविषयी प्राथमिक नियोजन करण्यात आले.

यानंतर कार्यकारिणीची एकमताने निवड झाली.

यावेळी प्रा. कट्यारे यांनी, मिनाक्षी चौधरी यांचे शाखा कार्याध्यक्ष म्हणून नाव सुचविले. त्यानुसार, मानसिक आरोग्य व्यवस्थापन प्रकल्प विभागाचे जिल्हा कार्यवाह मीनाक्षी चौधरी यांनी संघटनेच्या “एक व्यक्ती, एक पद” धोरणानुसार जिल्ह्याचे पद सोडून शहर शाखेचे कार्याध्यक्षपद सर्वानुमते स्विकारले. याशिवाय अध्यक्षपदी यशवंत बारी, उपाध्यक्ष म्हणून अजित चौधरी, प्रधान सचिव म्हणून हेमंत सोनवणे याची फेरनिवड झाली.

याशिवाय इतर कार्यकारिणीत वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प म्हणून आनंद ढिवरे, युवा सहभाग कार्यवाह गुरुप्रसाद पाटील, महिला सहभाग कार्यवाह प्रा. डॉ. कल्पना दिलीप भारंबे तर बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाह म्हणून जितेंद्र बाबुलाल धनगर यांची निवड झाली. बैठकीला ऍड. भरत गुजर, अजय जाधव, विलासराव देशमुख, प्रमोद पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add