Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»वाळूने भरलेला डंपर पकडल्यानंतर त्यावर कारवाई न करता तो सोडून दिल्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी

जळगाव

वाळूने भरलेला डंपर पकडल्यानंतर त्यावर कारवाई न करता तो सोडून दिल्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 13, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

मोबदल्यात लाचेची मागणी करणाऱ्या दोघांना अटक!

जळगाव – वाळूने भरलेला डंपर पकडल्यानंतर त्यावर कारवाई न करता तो सोडून दिल्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करणाऱ्या महसूल विभागाच्या दोन कर्मचा-यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी रंगेहाथ पकडले. म्हसावदचे मंडळ अधिकारी अभिजित नामदेव येवले (वय ३९) व ममुराबादचे तलाठी सदानंद व्यंकटी मुंडे (वय ३४) आणि अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, तक्रारदार हे वाळू व्यावसायिक असून ४ फेब्रुवारी रोजी ममुराबादचे तलाठी सदानंद मुंडे यांनी त्यांचा वाळूचा डंपर पकडला होता. मात्र, मंडळ अधिकारी अभिजित येवले यांनी फोनवरून सांगितल्यामुळे तो डंपर सोडून देण्यात आला होता. ही कारवाई टाळल्याच्या बदल्यात या दोघांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने या संदर्भात ११ फेब्रुवारी रोजी एसीबीकडे तक्रार नोंदवली. एसीबीने केलेल्या पडताळणीत ३० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार जुन्या जळगाव परिसरातील अभिजित येवले यांच्या खासगी कार्यालयात सापळा रचण्यात आला. ३० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना तलाठी सदानंद मुंडे यांना पथकाने ताब्यात घेतले. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add