Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»सीइओ मीनल करनवालांच्या ‘जळगाव पॅटर्न’ची राज्यभर चर्चा

जळगाव

सीइओ मीनल करनवालांच्या ‘जळगाव पॅटर्न’ची राज्यभर चर्चा

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 13, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

ई-गव्हर्नन्समध्ये जळगाव जिल्हा परिषद प्रथम

जळगाव : प्रशासकीय कामात वेगवानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या 150 दिवसांच्या विशेष ‘सेवाकर्मी ई-गव्हर्नन्स सुधारणा’ कार्यक्रमात जळगाव जिल्हा परिषदेने बाजी मारली असून राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत जळगाव जिल्हा परिषदेने प्रथम क्रमांक पटकावला आहे.


जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात ई-गव्हर्नन्सवर विशेष भर दिला जात होता. या यशामागे प्रामुख्याने विविध घटक कारणीभूत ठरले. कागदी फायलींचा प्रवास थांबवून संपूर्ण कामकाज डिजिटल करण्यावर भर, नागरिकांना विविध दाखले आणि सेवा घरबसल्या मिळाव्यात यासाठी यंत्रणा कार्यान्वित, सामान्य नागरिकांच्या तक्रारींची वेळेत दखल घेऊन त्या सोडवण्यासाठी ‘रिअल टाइम’ मॉनिटरिंग, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी राबविलेली विशेष मोहीम
महत्वाची ठरली.


राज्य शासनाने जळगाव जिल्हा परिषदेच्या या मॉडेलचे कौतुक केले असून, यामुळे प्रशासकीय उत्तरदायित्व वाढल्याचे म्हटले आहे. तंत्रज्ञानाधारित प्रशासन दिल्यास सामान्य माणसाचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होतो, हेच जळगाव जिल्हा परिषदेने आपल्या कामगिरीतून सिद्ध केले आहे.‘‘ या यशात केवळ एका व्यक्तीचा सहभाग नाही. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या सांघिक प्रयत्नांचे फळ आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून सामान्य माणसाचे काम सोपे करणे, हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
– मीनल करनवाल,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जळगाव

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add