
धुक्यामुळे रेल्वेच्या गतीला ब्रेक!
उत्तर भारतात कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे रेल्वेगाड्यांच्या वेगाला ब्रेक लागला असून दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून भुसावळ मार्गे धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. यामुळे प्रवाशांचेही वेळापत्रक गडबडले असून त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दिल्लीकडून येणाऱ्या बहुतांश गाड्या सोमवारी (दि. २२) २ ते १३ तास उशीराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल होता आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी आहे. धुक्यामुळे रेल्वे गाड्याचा वेग मंदावला आहे. दिल्ली, पंजाब पंजाब आणि उत्तर प्रदेशात दृश्यमानता ५० मीटरपेक्षा कमी झाल्याने रेल्वेच्या वेगावर मर्यादा आल्या आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून लोको पायलटला गाड्या संथ गतीने चालवाव्या लागता आहे. त्यामुळे भुसावळ स्थानकावर पहाटे आणि सकाळी येणाऱ्या गाड्या आता दुपारपर्यंत पोहोचता आहे.
चौकशी खिडकीवर प्रवासी गाड्यांबाबत चौकशी करता आहे. रेल्वे गाड्यांच्या अनिश्चिततेमुळे प्रवाशांना थंडीत प्लॅटफॉर्मवर ताटकळत बसावे लागते आहे. वृद्ध प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
या गाड्या विलंबाने धावताय
कामायनी एक्प्रेस दोन तास, दानापूर उधना एक्स्प्रेस दीड तास, सचखंड एक्सप्रेस तेरा तास, कर्नाटक एक्प्रेस चार तास, बनारस हुबळी एक्स्प्रेस तीन तास, पुष्पक एक्सप्रेस चार तास, एलटीटी सुपरफास्ट एक्प्रेस चार तास, कामाख्य एक्स्प्रेस पाच तास, पवन एक्प्रेस तीन तास, कुशीनगर एक्स्प्रेस चार तास, पठाणकोट एक्स्प्रेस चार तास, शालीमार एक्सप्रेस नऊ तास विलंबाने धावते आहे.


