Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»राजकारण»भुसावळ येथे भाजपचे जोडे मारो आंदोलन व प्रतिमा जाळून तीव्र निषेध

राजकारण

भुसावळ येथे भाजपचे जोडे मारो आंदोलन व प्रतिमा जाळून तीव्र निषेध

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 16, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाविरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने भुसावळ शहरात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले

भुसावळ प्रतिनिधी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाविरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने भुसावळ शहरात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना केल्याच्या वक्तव्यामुळे जनभावना दुखावल्याचा आरोप करत अष्टभुजा देवी मंदिराजवळ, जामनेर रोड येथे रविवारी आंदोलन पार पडले.

अष्टभुजा मंदीरा जवळ झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सपकाळ यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले तसेच प्रतिमा जाळून तीव्र संताप व्यक्त केला. संबंधित वक्तव्याबाबत तात्काळ माफी मागावी आणि इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांबाबत अवमानास्पद विधाने करणे थांबवावे, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलनादरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती असून वातावरण घोषणांनी दणाणून गेले होते. आंदोलन शांततेत पार पडले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.यावेळी भाजपा गटनेते युवराज लोणारी, उपनगराध्यक्ष शैलेजा नारखेडे,शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, किरण कोलते, मनोज बियाणी, सरचिटणीस पवन बुंदेले, अमोल महाजन, सागर चौधरी यांच्यासह जिल्हा चिटणीस प्रवीण इखणकर, पुरुषोत्तम नारखेडे, बोधराज चौधरी, देवेंद्र वाणी, नितीन धांडे, अनिता आंबेकर, शैलेजा पाटील, सोनल महाजन, वंदना सोनार, बापू महाजन, राजेंद्र आवटे, सुजित भोळे, आशिष पटेल, कैलास पाटील, अल्बर्ट तायडे, अनिरुद्ध कुलकर्णी, मुकेश मोरे, संकल्प वाणी, ऋषभ सिंह राजपूत, योगेंद्र हरणे, गोपी राजपूत, संजय बोचरे, विलास अवचार, कैलास शेलोडे, हेमंत सावकारे,सोनू अग्रवाल, सागर साळी तसेच पक्षाचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, आघाडी-मोर्चा पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add