Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»पोलीस भरतीची मैदानी चाचणी यशस्वी ; इतके उमेदवार पात्र?

ताज्या बातम्या

पोलीस भरतीची मैदानी चाचणी यशस्वी ; इतके उमेदवार पात्र?

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 24, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

पुरुष आणि महिला मिळून एकूण ३,८९७ उमेदवार पात्र ठरले. काही दिवसांपासून सुरू

जळगाव । जळगाव जिल्हा पोलीस दलातील १७१ रिक्त पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठी आयोजित करण्यात आलेली शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. पुरुष आणि महिला मिळून एकूण ३,८९७ उमेदवार पात्र ठरले. काही दिवसांपासून सुरू असलेली ही प्रक्रिया काल २२ फेब्रुवारी रोजी अंतिम टप्प्यात पूर्ण झाली.

भरती प्रक्रियेत महिला उमेदवारांचा उत्साह दिसून आला. १७१८ महिला उमेदवारांना बोलावण्यात आले होते, त्यापैकी १२२४ उमेदवार हजर राहिल्या. यामध्ये १६९ उमेदवार शारीरिक मोजमापात(वयोमर्यादेसह) तर मैदानी चाचणीत ६८४ उमेदवार अपात्र ठरल्या. ३७१ महिला उमेदवार मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या. शेवटच्या दिवशीही चोख बंदोबस्त आणि नियोजनामुळे प्रक्रिया सुरळीत पार पडली.

पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या थेट मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. नियमानुसार रिक्त १७१ जागांसाठी आता १:१० या प्रमाणात प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी तयार केली जाईल. यातून निवडक उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड होऊन यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add