Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ !

क्राईम

‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ !

Editorial DeskBy Editorial DeskSeptember 17, 2026Updated:September 17, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

यावल/जळगाव प्रतिनिधी | आदिवासी बांधवांपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, वैयक्तिक तसेच सामूहिक लाभाच्या योजना आणि शासकीय सेवांची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे करण्यात आला.

आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवा संकल्प चित्ररथाचे उद्घाटन करून त्यास हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी श्री. भरत सोळुंके, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. प्रशांत माहूरे, श्री. प्रवीण दाभाडे तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा संकल्प अभियानास शुभेच्छा देताना शासनाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सेवा संकल्प चित्ररथाच्या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत विविध योजनांची माहिती पोहोचण्यास निश्चितच मदत होईल,’ असे सांगितले*.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे मनोगत
अभियानास शुभेच्छा देत ‘शासनाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून आदिवासी भागातील नागरिकांना विविध योजनांची माहिती, मार्गदर्शन आणि शासकीय सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील,’ असे सांगितले.

सेवा संकल्प चित्ररथाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध आदिवासीबहुल व दुर्गम भागांमध्ये भ्रमण करून नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि उपलब्ध सुविधांची माहिती देण्यात येणार आहे. ‘शासनाच्या योजना – थेट लाभार्थ्यांपर्यंत’ या संकल्पनेनुसार कोणताही पात्र लाभार्थी शासनाच्या योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी अभियानाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे.

— प्रकल्प अधिकारी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जि. जळगाव

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

वाळूमाफियांविरोधात प्रशासनाची धडक मोहीम: १६ ट्रॅक्टर, ८ डंपर, १ जेसीबीसह साहित्य जप्त

September 18, 2026

केळीला २,३०० रुपये क्विंटलचा भाव; शेतकऱ्याने टाळ-मृदुंगाच्या गजरात साजरा केला आनंद!

September 18, 2026

३० सप्टेंबरपूर्वी पीक पेऱ्यांची नोंदणी करा; रावेर तालुक्यात केवळ १४ हजार शेतकऱ्यांची नोंद

September 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add