Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»केळीला २,३०० रुपये क्विंटलचा भाव; शेतकऱ्याने टाळ-मृदुंगाच्या गजरात साजरा केला आनंद!

क्राईम

केळीला २,३०० रुपये क्विंटलचा भाव; शेतकऱ्याने टाळ-मृदुंगाच्या गजरात साजरा केला आनंद!

Editorial DeskBy Editorial DeskSeptember 18, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | शेतीमालाला अपेक्षित भाव मिळाला की शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलते. जळगाव तालुक्यातील सुनसगाव येथील शेतकरी समाधान महाजन यांनी केळीला चांगला भाव मिळाल्याने अनोख्या पद्धतीने आनंद साजरा केला. केळीला तब्बल २ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने महाजन यांनी शेतातच भजन-कीर्तन आणि फुगड्यांचा आनंद घेतला.

समाधान महाजन यांनी आपल्या शेतात तब्बल २० हजार केळीच्या झाडांची लागवड केली आहे. पहिल्याच तोडणीत जवळपास ५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे अनेक दिवसांची मेहनत आणि केलेली गुंतवणूक याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले.

विशेष म्हणजे केळीला मिळालेल्या चांगल्या भावाचा आनंद त्यांनी केवळ कुटुंबीयांसोबत साजरा न करता शेतातच पारंपरिक पद्धतीने व्यक्त केला. टाळ-मृदुंगाच्या तालावर भजन-कीर्तन करत तसेच फुगड्या खेळत त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. या अनोख्या आनंदोत्सवाचा व्हिडिओ आणि छायाचित्रांची परिसरात चर्चा होत आहे.

महाजन यांच्या शेतातील अद्याप ४ ते ५ तोडण्या बाकी आहेत. आगामी सर्व तोडण्यांमधून जवळपास २० ते २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे केळीला मिळालेला चांगला बाजारभाव त्यांच्या अपेक्षांना बळ देणारा ठरला आहे.

केळी उत्पादनासाठी लागणारे खत, औषधे, मजुरी, पाणी आणि इतर खर्च यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने असतात. अशा परिस्थितीत उत्पादित मालाला चांगला भाव मिळाल्यास शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळतो. समाधान महाजन यांनी पारंपरिक पद्धतीने आनंद व्यक्त करत शेतकऱ्याच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

३० सप्टेंबरपूर्वी पीक पेऱ्यांची नोंदणी करा; रावेर तालुक्यात केवळ १४ हजार शेतकऱ्यांची नोंद

September 17, 2026

‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ !

September 17, 2026

यावलमध्ये दोन मुलांसह विवाहित महिलेचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

September 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add