Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»केळी उत्पादकांवर युद्धाचे संकट जागतिक परिणाम दिसू लागले आहेत.

ताज्या बातम्या

केळी उत्पादकांवर युद्धाचे संकट जागतिक परिणाम दिसू लागले आहेत.

Editorial DeskBy Editorial DeskMarch 5, 2026No Comments3 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

अमेरिका- इस्रायलचे इराण सोबत युद्ध सुरू होऊन चौथा दिवस आहे.

अमेरिका- इस्रायलचे इराण सोबत युद्ध सुरू होऊन चौथा दिवस आहे. युद्ध अमेरिका- इस्रायल व इराण मध्ये होत असले तरी त्याचे जागतिक परिणाम दिसू लागले आहेत. भारताला कच्चेतेल पुरविणाऱ्या इराणकडून सध्या पुरवठा होत नाही. एक महिना पुरेल इतकेच तेल भारतात आहे. त्यामुळे पेट्रोलच्या किमती वाढत आहेत. आत्ताच पेट्रोल मिळवण्यासाठी पेट्रोल पंपावर रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. या युद्धामुळे हवाई वाहतुकीवर परिणाम होतो आहे. अनेक विदेशात जाणारी विमान उड्डाणे रद्द झाली आहेत. काही भारतीय नागरिक दुबईत विमानतळावर अडकली होती. त्यांना भारतात सुखरूप आणण्यात यश आले आहे.

अमेरीका युद्धात उतरल्यामुळे अमेरिकन व्यापाराचा भारतावर परिणाम होतो आहे. त्यापैकीच एक म्हणजे भारतीय केळी उत्पादकांना युद्धाचा फटका बसतो आहे. आखाती देशांमध्ये जे केळीचे कंटेनर गेलेले आहेत, ते अडकून पडले आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांनाही फटका बसला आहे. जिल्ह्यातील केळी उत्पादकांची केळी जी आखाती देशात पाठवण्यात येत होती, ती निर्यात सध्या बंद आहे. तसेच पूर्वी गेलेले कंटेनर युद्धामुळे अडकून पडले आहेत. त्यामुळे सध्या रमजानचा महिना असून सुद्धा केळीप्रमाणे इतर फळांना असलेली मागणी पाहता ती निर्यात होत नाही. त्यामुळे आखाती देशात जाणारे कंटेनर बंद पडले आहेत. केळी निर्यातीवर पाबंदी आलेली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी ही अत्यंत पडक्या भावाने विकली जात आहेत. केळीचे भाव एकदम खाली गेले आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

जळगाव जिल्ह्यातून दररोज 12 कंटेनर केळी आखाती देशांमध्ये जात होती, परंतु ती युद्धामुळे जाणे बंद झाले आहे. अमेरिका इस्रायल आणि इराण देशात सुरू असलेल्या युद्धामुळे जळगाव जिल्ह्यातील केळीची निर्यात पूर्णपणे बंद झाली आहे. सध्या रमजान महिना चालू असून आखाती देशात येणारे मुस्लिम देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर केळीची जळगाव जिल्ह्यातून निर्यात होत असल्याने एकीकडे केळीची निर्यात ठप्प झाली असून दुसरीकडे केळीच्या भावात मोठी घसरण झाल्याने केळी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. युद्धापूर्वी केळीचे दर 2500 रुपये क्विंटल एवढे होते. परंतु त्यात आता घट झाल्यामुळे 1500 रुपये क्विंटल एवढा दर केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळतो आहे. भारत देशाने या तोडगा काढून केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीतून बाहेर काढण्याची शेतकऱ्यांनी शासनाला विनंती केली आहे. युद्धाचे संकट वाढल्यामुळे सध्या जळगाव जिल्ह्यातील शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडला आहे. अमेरिका इस्रायल व इराण या देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांकडे होणारी केळीची निर्यात पूर्णपणे ठप्प पडली आहे. परिणामी केळीला गोल्डन पीक म्हणून संबोधणाऱ्या खानदेशातील अर्थकारण बिघडले आहे. जळगाव जिल्हा हा देशात केळी उत्पादन करणारा पट्टा म्हणून ओळखला जातो.

तापी खोऱ्यातील सुपीक जमीन, मुबलक पाणी यामुळे जळगाव जिल्ह्यातील केळीला प्रमुख मागणी असते. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धामुळे एकूण निर्यातीवर परिणाम झाल्यामुळे केळीचे घाऊक भाव घसरले आहेत. पंधराशे रुपये प्रतिक्विंटल भाव असल्यामुळे केळी उत्पादक हवालदिल झाले आहे. एकतर केळीला बाजारपेठ मिळत नाही. त्यात आणखी देशात रमजान महिना असल्यामुळे केळीला वाढती मागणी होती. अशात हे युद्ध सुरू झाल्याने निर्यातीवर त्याचा परिणाम झाला आहे. केळी हे नाशवंत फळ असल्यामुळे जास्त दिवस ते ठेवता येत नाही. कंटेनर मधून काढून केळीला शीतगृहात ठेवले तर ती काही दिवस राहू शकते, परंतु केळीचे कंटेनर मधील केळी शीतगृहात ठेवणे कठीण असते.

त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावर शीतगृह उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे ती केळी काही दिवसांनी फेकून द्यावी लागते. म्हणून भारतीय केळी उत्पादकांची मागणी आहे की, केळीला नाशवंत फळाचा दर्जा द्यायला हवा. परंतु आपल्या भारतात सरकार केळीला नाशवंत फळाचा दर्जा देत नाही ही एक शोकांतिका आहे. त्याचबरोबर रेल्वे वॅगनद्वारे केळी भारतात पाठवायची असेल तर रेल्वे वॅगन चे दर कमी करून मिळाले पाहिजे. ते भारत सरकारकडून केले जात नाही हे खेदाने म्हणावे लागते. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या केळी उत्पादकांना भारत सरकारची मदत झाली तरच केळी उत्पादक तग धरू शकतील..!

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add