Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»पाटबंधारे विभागातील देखभाल दुरुस्ती कामांची चौकशीची मागणी.

ताज्या बातम्या

पाटबंधारे विभागातील देखभाल दुरुस्ती कामांची चौकशीची मागणी.

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 6, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

उपविभागीय अधिकारी हे मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नसल्याने कार्यकारी अभियंता यांचे टक्केवारीमुळे,अर्थपूर्ण दुर्लक्ष होत

यावल प्रतिनिधी : जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव अंतर्गत देखभाल दुरुस्ती कामांची चौकशी करण्याची मागणी गेल्या वर्षापासून करण्यात आली आहे.कार्यक्षेत्रातील अनेक उपविभागीय अधिकारी हे मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नसल्याने कार्यकारी अभियंता यांचे टक्केवारीमुळे,अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची चर्चा जळगाव जिल्ह्यातील शेतकरी वर्गातून तसेच तक्रारदारांमध्ये आहे.

२३ फेब्रुवारी २०२६ रोजी तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव कार्यकारी संचालक यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते नितीन सुरेश रंधे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद करण्यात आली आहे की २८ मे २०२५ रोजी तसेच २२ जानेवारी २०२६ रोजी तक्रार अर्ज दिले आहेत त्यात नमूद करण्यात आले आहे की तापी पाटबंधारे विकास महामंडळ तसेच कार्यक्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी तक्रार केली आहे त्यावर अद्याप खुलासा प्राप्त नाही याबाबत २ वेळा उपोषण सुद्धा करण्यात आले उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी पहिल्यांदा जळगाव लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण अधीक्षक अभियंता यांचे मार्फत धुळे पाटबंधारे विभाग धुळे कार्यकारी अभियंता यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमण्यात आले होते ते आज पर्यंत चौकशी करण्यासाठी आलेले नाही.

त्यानंतर १७ मार्च २०२५ रोजी तापी पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले त्यावेळी पुन्हा मला उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी आपल्या कार्यालयाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांना पुन्हा चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले परंतु स्वतः कार्यकारी संचालक यांचे आदेश असून सुद्धा १४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत कोणत्याही चौकशी अधिकाऱ्याने चौकशी केली नाही याचा अर्थ असा की चौकशी अधिकारी नेमणूक करणे ही बनवाबनवी आणि वेळ काढूपणा आहे.आणि केलेल्या तक्रारीनुसार गैरप्रकार अनियमितपणा याला आपली मुखसंमती मान्यता असल्याचे दिसून येत आहे यामध्ये शासनाचा वेळ काढूपणा व गैरप्रकाराला राज मान्यता असल्याची सहमती दिसून येते. आपण चौकशी व कार्यवाही न केल्याने पुन्हा दिनांक १६ मार्च २०२६ पासून उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागणार आहे याची आपण नोंद घेऊन पुढील सर्वस्वी जबाबदारी आपली शासकीय आणि वैयक्तिक स्वरूपाची राहील याची नोंद घ्यावी असे नशिराबाद येथील नितीन सुरेश रंधे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add