Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»मुक्ताईनगर येथे गुटखा जप्त; ६.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

मुक्ताईनगर येथे गुटखा जप्त; ६.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Editorial DeskBy Editorial DeskMarch 27, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

अवैध गुटखा साठा व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

मुक्ताईनगर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याविरोधात जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत मुक्ताईनगर तालुक्यातून सुमारे ६ लाख ४८ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध गुटखा साठा व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्णाड फाटा ते सुकळी गावादरम्यान राशा वर्डा जवळ सावं. रोडवर पोलिसांनी ही कारवाई केली.


या कारवाईत अनिकेत शिवाजी सुरवसे रा. सावरगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) याच्या ताब्यातील वाहनातून २,४३,३६० रुपये किमतीचा केसरयुक्त विमल पानमसाला व V-1 तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. तसेच ४ लाख रुपये किमतीचे MH-14/DX-1463 क्रमांकाचे वाहन आणि ५ हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण ६,४८,३६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.


ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते व कविता नेरकर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या पथकाने केली.दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी योगराज किशोर सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

३० सप्टेंबरपूर्वी पीक पेऱ्यांची नोंदणी करा; रावेर तालुक्यात केवळ १४ हजार शेतकऱ्यांची नोंद

September 17, 2026

‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ !

September 17, 2026

यावलमध्ये दोन मुलांसह विवाहित महिलेचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

September 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add