Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»शिवापुर तांडा येथे पती-पत्नीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना

ताज्या बातम्या

शिवापुर तांडा येथे पती-पत्नीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना

Editorial DeskBy Editorial DeskMarch 29, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

शिवापुर तांड्यात दांपत्याचा संशयास्पद मृत्यू चाळीसगावात खळबळ

चाळीसगाव प्रतिनिधी : तालुक्यातील शिवापुर तांडा येथे पती-पत्नीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, भगवान पोपट जाधव (वय 38) व त्यांची पत्नी आशाबाई भगवान जाधव (वय 27, दोघेही रा. शिवापुर तांडा, ता. चाळीसगाव) यांना मृत अवस्थेत चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ही घटना 28 मार्च रोजी सकाळी 9.45 वाजण्यापूर्वी घडल्याचे समोर आले आहे.दोघांचाही मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाल्याची प्राथमिक माहिती असून, याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणे अनुक्रमे अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक 19/2026 व 20/2026 (BNSS कलम 194) अंतर्गत नोंदविण्यात आली आहेत.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा व प्राथमिक कार्यवाही करून अहवाल न्यायालयाकडे पाठविला आहे.

पुढील तपास पोलीस हवालदार प्रविण सपकाळे यांच्या मार्फत सुरू असून, या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
दरम्यान, एकाच कुटुंबातील दोघांचा एकाच वेळी झालेला मृत्यू संशयास्पद मानला जात असून, पोलिसांकडून सर्व अंगांनी पोलीस हवालदार प्रविण संगिले व हवालदार अकरम बेग तपास करत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add