Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेला रविवारी नवे बळ मिळाले.

जळगाव

शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेला रविवारी नवे बळ मिळाले.

Editorial DeskBy Editorial DeskMarch 30, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

महापौरांनी राबविली स्वच्छता मोहीम ; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

जळगाव प्रतिनिधी : शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेला रविवारी नवे बळ मिळाले. शहरातील गजबजलेल्या गोलाणी मार्केट परिसरात महापौर दीपमाला काळे यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विशेष म्हणजे, महापौरांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी करत स्वच्छतेच्या कामाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती निर्माण झाली.

प्रलंबित प्रश्नाला दिला हात

गोलाणी मार्केटमधील गाळेधारक न्यायालयात गेल्यामुळे या परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित होता. स्थानिक नागरिकांच्या सातत्यपूर्ण तक्रारींची दखल घेत महापौरांनी विशेष मोहिम राबवली. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांना स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

२२ टन कचऱ्याची विल्हेवाट

सहायक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ४५३ बीव्हीजी कामगारांच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात आली. पाच ट्रॅक्टर, तीन पिकअप आणि एक डंपरच्या साहाय्याने तब्बल २२ टन कचरा हटवण्यात आला. या धडक कारवाईमुळे परिसरात स्वच्छतेचे चित्र निर्माण झाले.

नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

अभियानादरम्यान महापौरांनी फळ विक्रेत्यांची झाडाझडती घेत, रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना तो स्वतः उचलण्यास भाग पाडले. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर थेट कारवाई करत त्या जप्त करण्यात आल्या. पुढील दोन दिवसांतही प्लास्टिकचा वापर सुरू ठेवल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला.

यांचा होता सहभाग

या मोहिमेत माजी महापौर तथा शिवसेना गटनेते विष्णू भंगाळे, स्वच्छता अधिकारी अनिल कांबळे, मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे, तसेच रुपेश भालेराव, मुकेश पाटील, समाधान निकम, मयूर सपकाळे, प्रदीप भापसे यांच्यासह स्वच्छता कर्मचारी आणि व्यापाऱ्यांचा मोठा सहभाग होता.

“स्वच्छता ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. प्लास्टिकचा वापर थांबवून स्वच्छतेची सवय अंगीकारणे आवश्यक आहे.”

– दीपमाला काळे, महापौर, जळगाव

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add