Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»नाशिक येथेराहणारा दहशत पसरविणाऱ्यासाठी गावठी कट्टे घेऊन फिरणाऱ्या चौघांवर कारवाई

जळगाव

नाशिक येथेराहणारा दहशत पसरविणाऱ्यासाठी गावठी कट्टे घेऊन फिरणाऱ्या चौघांवर कारवाई

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 31, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

दहशत पसरविणाऱ्यासाठी गावठी कट्टे घेऊन फिरणाऱ्या चौघांवर जिल्हापेठ व एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली.

जळगाव – दहशत पसरविणाऱ्यासाठी गावठी कट्टे घेऊन फिरणाऱ्या चौघांवर जिल्हापेठ व एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली. त्यातील दोन जणांना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून दोन कट्टे, ८ जिवंत काडतूस, दोन दुचाकी व मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे.

नाशिक येथे राहणारा अक्षय आनंदा सैंदाणे (वय २९) हा काही दिवसांपुर्वी जळगावत राहणाऱ्या नातेवाईकांकडे आला होता. त्याने मध्यप्रदेशातून गावठी कट्टा खरेदी केला आणि तो दि. २८ मार्च रोजी शासकीय आयटीआयच्या मागे कट्टा घेऊन दुचाकीने रेल्वे स्टेशन येथे जात होता. मात्र त्यापुर्वीच जिल्हापेठ पोलिसांनी त्याच्या मुसक्या अवळल्या. त्याची कसून चौकशी केली असता, त्याच्याकडे एक गावठी कट्टा, पाच जिवंत काडतूस व दुचाकी जप्त केली. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आले.

तालुक्यातील कुसुंबा शिवारात दीपक ठकुबा गुंजाळ (वय २८), विठ्ठल रंगनाथ सोनवणे (वय २५, दोघ रा. सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर) व अजय बिरजू गारुंगे (रा. कंजरवाडा) हे गावठी कट्टा घेऊन फिरत होते. त्या वेळी एमआयडीसी पोलिसांनी त्यांच्याकडून गावठी कट्टा, तीन जिवंत काडतूस, दुचाकी व मोबाईल हस्तगत केले. यातील दीपक गुंजाळ याला अटक करण्यात आली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add