Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»जळगावचा बळीराजा कोलमडला! ८४९० हेक्टरवरील पीक उद्धवस्त; मका, केळी अन् बाजरीचा पार ‘चिखल’!

ताज्या बातम्या

जळगावचा बळीराजा कोलमडला! ८४९० हेक्टरवरील पीक उद्धवस्त; मका, केळी अन् बाजरीचा पार ‘चिखल’!

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraApril 3, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

११ तालुक्यांतील ४३० गावांत अवकाळीचा ‘धुमाकूळ’; १३ हजार शेतकऱ्यांची स्वप्ने मातीमोल

जळगाव प्रतिनिधी :जळगाव जिल्ह्यावर पुन्हा एकदा अस्मानी संकट धावून आले असून, २ एप्रिल रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जिल्ह्याच्या शेतीचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधील ४३० गावांमध्ये निसर्गाचा हाहाकार पाहायला मिळाला असून, तब्बल १३,४६६ शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, ८,४९०.४१ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुन्हा एकदा संकटाच्या खाईत लोटला गेला आहे.

२ एप्रिल रोजी झालेल्या वादळी पावसादरम्यान. अवकाळी पाऊस आणि वेगवान वादळी वारा. जळगाव जिल्ह्यातील १३,४६६ शेतकरीचे ८,४९० हेक्टरवरील विविध पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून जळगाव भुसावळ यावल रावेर मुक्ताईनगर बोदवड अमळनेर चोपडा दरडगाव पारोळा जामनेर या ११ तालुकेमध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.

तालुकानिहाय नुकसानीची आकडेवारी

या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील बागायती क्षेत्राला मोठा तडाखा दिला आहे. सर्वाधिक फटका मुक्ताईनगर, अमळनेर आणि चोपडा तालुक्यांना बसला आहे.

जळगाव सात गावांमधील 92 शेतकऱ्यांचे 55 हेक्टर वरचे नुकसान

भुसावळ सोडा गावांमधील 83 शेतकऱ्यांचे 49.10 हेक्टर वरील नुकसान

यावल 25 गावांमधील 190 शेतकऱ्यांचे 147.39 हेक्टर वरील नुकसान

रावेर 34 गावांमधील 251 शेतकऱ्यांचे 226.7 हेक्टर वरील पिकांचे नुकसान

मुक्ताईनगर 26 गावांमधील 4252 शेतकऱ्यांचे 2844.80 हेक्टर वरील

बोदवड 24 गावांमधील 310 शेतकऱ्यांचे 169.80 हेक्टर वरील

अमळनेर 126 गावांमधील 494 शेतकऱ्यांचे 2233.70 हेक्टर वरील

चोपडा 97 गावांमधील 2992 शेतकऱ्यांचे 100975.55 हेक्‍टरवरील

धरणगाव 48 गावांमधील 602 शेतकऱ्यांचे 418 हेक्टर वरील

पारोळा सात गावांमधील 279 शेतकऱ्यांचे 13 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान

जामनेर वीस गावांमधील 331 शेतकऱ्यांचे 158 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान असे

एकूण 430 गावांमधील 13466 शेतकऱ्यांचे 8490.41 हेक्टर वरील पिकांचे नुकसान

केळी, मका अन् बाजरी मातीमोल!

जळगावची ओळख असलेल्या केळीच्या बागांना या पावसाने मोठा दणका दिला आहे. सुमारे २,७९२ हेक्टरवरील केळीचे नुकसान झाले आहे. त्या खालोखाल मका (३००६ हेक्टर) आणि ज्वारी (१२९८ हेक्टर) या पिकांचा पार चिखल झाला आहे. बाजरी, कांदा, गहू आणि भाजीपाला पिकांचेही नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. फळपिकांमध्ये लिंबू, पपई आणि मोसंबीच्या बागांनाही फटका बसला आहे.

पिकांचा नुकसानीचा तपशील (हेक्टरमध्ये):

मका: ३००६.५२

केळी: २७९२.२४

ज्वारी: १२९८.३०

बाजरी: ५६४.९०

कांदा: ३१६.८९

इतर फळपिके: १७७.९०

बाजरी 564.90 गहू 114 हरभरा 0.50 भाजीपाला 44.40 इतर 101.85 लिंबू 9,पपई 62.50 मोसंबी 1.50 एकूण 8490.41

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add