
पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या बळावर भाजप अवलस्थानी ; आमदार राजूमामा भोळे
जळगाव । जळगाव जिल्हा महानगर भाजपाच्या वतीने पक्ष स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बळीराम पेठ येथील जी.एम. फाउंडेशन आणि जुने भाजप कार्यालय येथे पक्ष ध्वजवंदन व सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
सकाळी ८.३० वाजता ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर मांढरे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम आणि महाराष्ट्र गीताने झाली. यावेळी पक्षाच्या दिवंगत कार्यकर्त्यांसह ज्ञात-अज्ञात व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या कार्यक्रमात भाजपाच्या ४६ ज्येष्ठ व कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये स्मृतिचिन्ह भाजपाचा गमच्या व तांब्याचा दिवा असे सन्मानाचे स्वरूप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. पक्षाच्या वाढीमध्ये या कार्यकर्त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सर्वप्रथम गजानन जोशी, मधुकर मांढरे उदय भालेराव, भगत बालानी, सुनील बढे, कवरलाल संघवी ,अरुण बोरवले, उज्वलाताई बेंडाळे, मुकुंद मेटकर, यशवंत पटेल, लीलाधर ठाकरे, सुनील नारखेडे, विशाल त्रिपाठी, रमेश जोगी, गजानन नेवे,अशोक कोष्टी, किशोर नारखेडे, प्रदिप रोटे, पार्वतीबेन पटेल, रजनी महाजन, महाश्वेता माथुरवैश्य, कुसुमताई सोनवणे, मालतीताई पाटील, बाणाबाई शेवाळे, किसन मराठे ,भाग्यश्री चौधरी, सुशील हसवाणी, बाळू कासार,पुरुषोत्तम वाणी ,मुकुंद कासार, देवानंद बारी, विकास घोडके, संजय भावसार, पुंडलिक सपकाळे, राजेंद्र मराठे, सुभाष सोनवणे, दीप्ती चिरमाडे, यांचा सत्कार करण्यात आला.


