Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»लग्नास नकार दिल्याने तरुणीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; नराधमावर गुन्हा दाखल

क्राईम

लग्नास नकार दिल्याने तरुणीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; नराधमावर गुन्हा दाखल

Editorial DeskBy Editorial DeskMay 2, 2026Updated:May 2, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

​पाचोरा प्रतिनिधी |  लग्नास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने तरुणीचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून तिच्या भावाला पाठवल्याचा धक्कादायक प्रकार पाचोरा शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथील एका २३ वर्षीय तरुणाने पोलिसांत तक्रार दिली आहे. संशयित आरोपी सोनुसिंग अजितसिंग चितोडिया (रा. सातारा परिसर, संभाजीनगर) याला तरुणाच्या बहिणीशी लग्न करायचे होते. मात्र, तरुणीने लग्नास नकार दिल्याने संशयिताने मनात राग धरला होता. मागील दोन महिन्यांपासून हा छळ सुरू होता.
​ ३० एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास संशयिताने फिर्यादीच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर काही अश्लील व्हिडिओ आणि आक्षेपार्ह मजकूर पाठवला.  एवढेच नव्हे तर तरुणीची बदनामी करण्याची धमकीही त्याने दिली. हे व्हिडिओ तरुणीच्या आई-वडिलांनी आणि कुटुंबातील सदस्यांनी पाहिल्याने कुटुंबाची समाजात मोठी बदनामी झाली असून तरुणीचा विनयभंग केला.

​याप्रकरणी संशयित आरोपी सोनुसिंग अजितसिंग चितोडिया (रा. सातारा परिसर, संभाजीनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026

यावलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; महर्षी व्यास मंदिरात हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add