जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील समता नगर भागात भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका १९ वर्षीय तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
शाहीद फारुख शेख (वय १९, रा. समता नगर, जळगाव) हा ३० एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास आपल्या घराच्या परिसरात होता. यावेळी समता नगरमधील कल्पना सैंदाणे यांच्या घरासमोर आरोपी अहमद उर्फ वसीम शेख कलीम शेख, समीर पिंजारी आणि इरफान पिंजारी हे तिघे मिळून मुशर्रफ शेख नावाच्या व्यक्तीला लोखंडी कोयत्याने मारहाण करत होते. परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असताना, शाहीद हा हे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेला.
भांडण सोडवायला गेलेल्या शाहीदचा राग आल्याने तिन्ही आरोपींनी त्याला अवाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपींनी केवळ शिवीगाळच केली नाही, तर त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या दरम्यान, एका आरोपीने आपल्या हातातील लोखंडी कोयत्याने शाहीदच्या उजव्या हाताच्या दंडावर जोरात वार केला, ज्यामुळे तो गंभीर जखमी करत धमकी दिली.
या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी शाहीदने तातडीने रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार रामानंद नगर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.



