Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»अपघाताची विचारपूस करणे पडले महागात; तरुणावर जीवघेणा हल्ला

क्राईम

अपघाताची विचारपूस करणे पडले महागात; तरुणावर जीवघेणा हल्ला

Editorial DeskBy Editorial DeskMay 3, 2026Updated:May 3, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरालगत असलेल्या जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या आजोबांच्या वाहनाला झालेल्या अपघाताबाबत विचारपूस करण्यासाठी गेलेल्या एका २२ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, फैजल शेख कलीमोद्दीन (वय २२, रा. इस्लामपुरा, जळगाव) यांचे आजोबा आणि मयुर लहासे यांच्या कारचा काही वेळापूर्वी अपघात झाला होता. या अपघाताबाबत माहिती घेण्यासाठी आणि विचारपूस करण्यासाठी फैजल हे आपल्या आजोबांसह १ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास जळगाव-पाळधी नवीन हायवेवरील पुलाखाली असलेल्या अत्तरदे पेट्रोल पंपाजवळ गेले होते.

अपघाताबाबत विचारपूस सुरू असतानाच वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यावेळी आरोपी मुन्ना पहलवान याने रागाच्या भरात हातातील लाकडी काठीने फैजलच्या डोक्यावर आणि डोळ्याजवळ जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात फैजल गंभीर जखमी झाला आहे. केवळ इतकेच नव्हे, तर इतर आरोपी मयूर लहारे, खुशाल वालकर आणि रतिलाल सोनवणे यांनी फैजल आणि त्यांच्या आजोबांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ गुलाब माळी हे करीत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026

यावलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; महर्षी व्यास मंदिरात हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add