Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»आयपीएल सट्टेबाजांचे रॅकेट उद्ध्वस्त! जामनेर पोलिसांची हिवरखेडा परिसरात मोठी कारवाई

क्राईम

आयपीएल सट्टेबाजांचे रॅकेट उद्ध्वस्त! जामनेर पोलिसांची हिवरखेडा परिसरात मोठी कारवाई

Editorial DeskBy Editorial DeskMay 10, 2026Updated:May 10, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

​जामनेर प्रतिनिधी | आयपीएल क्रिकेट सामन्यांच्या निमित्ताने सुरू असलेल्या ऑनलाईन सट्ट्याविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने जामनेर परिसरात मोठी कारवाई केली आहे. हिवरखेडा रोडवरील एका घरात सुरू असलेल्या सट्ट्यावर छापा टाकून पोलिसांनी सुमारे १० लाख ५३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

जामनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हिवरखेडा रोडवर एका घरात काही इसम आयपीएल क्रिकेट मॅचवर ऑनलाईन सट्टा लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून सदर ठिकाणी धाड टाकली.

या कारवाईत पोलिसांनी ​९ लाख २ हजार ३०० रुपये रोख रक्कम, ​१ लाख ३० हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन,​२५ हजार रुपये किमतीचा एक टीव्ही आणि साउंड बार, ४१ एटीएम (ATM) कार्ड्स आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

याप्रकरणी देवानंद सुभाष सोनवणे, रितेश अशोक नेरकर, परीक्षित रवींद्र पाटील आणि प्रवीण जगन्नाथ टहाकडे (सर्व रा.जामनेर) या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा ल दाखल करण्यात आला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026

यावलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; महर्षी व्यास मंदिरात हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित

July 28, 2026

‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात रंगणार भक्तीचा स्वरसोहळा

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add