Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरट्यांनी धूमस्टाईल लांबविली !

क्राईम

महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरट्यांनी धूमस्टाईल लांबविली !

Editorial DeskBy Editorial DeskMay 16, 2026Updated:May 16, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

​पाचोरा प्रतिनिधी | पाचोरा शहरातील भडगाव रोड परिसरातील जय भवानी मॉलजवळ एका ४६ वर्षीय शिक्षिकेच्या गळ्यातील २ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी पोत (मंगळसूत्र) अज्ञात चोरट्याने जबरीने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली योगेश मोरे (वय ४६, रा. चिंतामणी कॉलनी, पाचोरा, जि. जळगाव) या पेशाने शिक्षिका आहेत. त्या आपल्या बहिणीसह संसारोपयोगी साहित्याची खरेदी करण्यासाठी भडगाव रोडवरील जय भवानी मॉलमध्ये गेल्या होत्या. रात्री ९:४५ वाजेच्या सुमारास खरेदी करून त्या पायी घरी परतत असताना, रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने परिसरात मोठा अंधार होता.

​या अंधाराचा फायदा घेत अंदाजे ४० वर्षे वयाचा, मजबूत शरीराचा एक अज्ञात इसम मागून आला. त्याने फिर्यादी मोरे यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची सोन्याची मिनी पोत जोराने ओढून काढली. महिलांनी तातडीने ‘चोर-चोर’ असा आरडाओरडा करत चोराचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आजूबाजूला लोक जमा होण्यापूर्वीच चोरट्याने थोड्या अंतरावर उभी करून ठेवलेली आपली मोटार सायकल स्टार्ट केली आणि तो अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.

​या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी बापु रोहम आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांनी रात्री घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ करत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026

यावलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; महर्षी व्यास मंदिरात हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित

July 28, 2026

‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात रंगणार भक्तीचा स्वरसोहळा

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add