Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»यंदा जळगावात रंगणार ‘योगसप्ताह’; महाराष्ट्र योगशिक्षक संघाचा अभिनव उपक्रम, ४० हजारांची पारितोषिके!

जळगाव

यंदा जळगावात रंगणार ‘योगसप्ताह’; महाराष्ट्र योगशिक्षक संघाचा अभिनव उपक्रम, ४० हजारांची पारितोषिके!

Editorial DeskBy Editorial DeskMay 18, 2026Updated:May 18, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी । आगामी २१ जून रोजी साजरा होणाऱ्या ‘जागतिक योगदिवसा’चे औचित्य साधून यंदा जळगाव जिल्ह्यात केवळ एक दिवस नव्हे, तर पूर्ण ‘योगसप्ताह’ साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. जळगाव जिल्हा कार्यकारिणीची ही ऑफलाइन बैठक रविवार १७ मे २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजता जिल्हाध्यक्षा चित्रा महाजन यांच्या निवासस्थानी उत्साहात पार पडली.

या बैठकीत मार्गदर्शन करताना महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. कृणाल महाजन यांनी ‘योगसप्ताह’ साजरा करण्याची अभिनव संकल्पना मांडली. या सप्ताहाच्या माध्यमातून योगाचा प्रसार घराघरांत पोहचवण्यासाठी विविध स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यानुसार या योगसप्ताहात चित्रकला स्पर्धा, योगासन स्पर्धा, योगनृत्य स्पर्धा, योगगीत स्पर्धा, सूत्रपठण स्पर्धा आणि सद्यस्थितीत लोकप्रिय असलेल्या ‘रिल्स् स्पर्धा’ अशा एकूण ६ वेगवेगळ्या स्पर्धा घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

या स्पर्धांमधील पहिल्या तीन विजेत्यांना जागतिक योगदिनाच्या मुख्य कार्यक्रमात (२१ जून) प्रमाणपत्र आणि एकूण ४० हजार रुपयांपर्यंतची रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धांच्या नियोजनासाठी विशेष समित्यांची नियुक्ती करण्यात आली असून, अनुपस्थित पदाधिकाऱ्यांनाही यात जबाबदारी दिली जाणार आहे.

बैठकीत उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख श्री. सुनील गुरव आणि जिल्हाध्यक्षा सौ. चित्रा महाजन यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. हा योगसप्ताह यशस्वी करण्यासाठी जिल्हा समितीच्या सर्व सदस्यांनी कटिबद्धतेचे आश्वासन दिले. या सप्ताहाचे सविस्तर वेळापत्रक आणि स्थळ लवकरच जाहीर केले जाईल, असे सांगण्यात आले. उपस्थितांनी थंडगार पेयाचा आस्वाद घेतल्यानंतर बैठकीची सांगता झाली.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add