Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»जळगाव हादरले: घरातून बेपत्ता झालेल्या वृद्धेचा मेहरुण तलावात बुडून मृत्यू!

क्राईम

जळगाव हादरले: घरातून बेपत्ता झालेल्या वृद्धेचा मेहरुण तलावात बुडून मृत्यू!

Editorial DeskBy Editorial DeskMay 21, 2026Updated:May 21, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​जळगाव प्रतिनिधी | शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातून अचानक निघून गेलेल्या एका ६८ वर्षीय वृद्धेचा मेहरुण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सिंधूबाई भिला चौधरी (वय ६८, रा. जुने जळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवार २० मे रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, सिंधूबाई चौधरी या जुने जळगाव परिसरातील पांझरापोळ टाकीजवळ आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होत्या. बुधवारी सकाळच्या सुमारास त्या कोणालाही काहीही न सांगता अचानक घरातून निघून गेल्या होत्या. त्या बऱ्याच वेळानंतरही घरी न परतल्यामुळे कुटुंबियांनी त्यांची चिंता व्यक्त केली आणि सर्वत्र शोध सुरू केला. नातेवाईक आणि परिचित लोकांकडे विचारपूस करूनही त्यांचा कुठेच पत्ता लागत नव्हता.

​गणेश घाटाजवळ मृतदेह तरंगताना आढळला :
कुटुंबिय शोध घेत असतानाच, दुपारच्या सुमारास मेहरुण तलावातील गणेश घाटाजवळ एक मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांना मिळाली. नागरिकांनी तात्काळ ‘डायल ११२’ वर कॉल करून पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

​कुटुंबियांचा आक्रोश :
पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. यादरम्यान शोध घेत असलेले सिंधूबाईंचे नातेवाईकही मेहरुण तलावावर पोहोचले. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली असता तो सिंधूबाईंचाच असल्याचे स्पष्ट झाले. सिंधूबाईंची ओळख पटताच कुटुंबियांनी घटनास्थळीच एकच आक्रोश केला, ज्यामुळे उपस्थितांचेही डोळे पाणावले.

​त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला. तेथे डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले. मयत सिंधूबाई यांच्या पश्चात एक मुलगा, दोन विवाहित मुली, सून, नातवंडे आणि जावई असा मोठा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add