Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»​धक्कादायक: भावाला मारण्याची धमकी देऊन तरुणीवर अत्याचार !

क्राईम

​धक्कादायक: भावाला मारण्याची धमकी देऊन तरुणीवर अत्याचार !

Editorial DeskBy Editorial DeskMay 22, 2026Updated:May 22, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | भावाला जिवंत मारण्याची धमकी देऊन एका १८ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, तांबापुरा मच्छी मार्केट भागातील रहिवासी असलेल्या शाकीब अस्लम पटेल (वय २०) याने पीडित तरुणीला तिच्या भावाला मारून टाकण्याची धमकी दिली होती. या भितीचा गैरफायदा घेऊन आरोपीने १ नोव्हेंबर २०२५ ते २० मे २०२६ या कालावधीत पीडितेला तिच्या राहत्या घरी वेळोवेळी बोलावून घेतले. तिच्या संमतीविना आणि विरोधाला न जुमानता आरोपीने तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले.

​या अत्याचारादरम्यान पीडित तरुणी गर्भवती राहिली. ही बाब समोर आल्यानंतर आरोपी शाकीब याने तिला गर्भपाताच्या गोळ्या आणून दिल्या आणि त्या खाण्यास जबरदस्तीने भाग पाडले, अशी तक्रार पीडितेने पोलिसांत दिली आहे.

​पीडितेच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी २१ मे रोजी रात्री आरोपी शाकीब अस्लम पटेल याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add