Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»आरोग्य»पंढरीत सायकलिस्टांचा महासागर; जळगावच्या ७५ सदस्यांसह महापौर दीपमाला काळे ठरल्या आकर्षणाचा केंद्रबिंदू

आरोग्य

पंढरीत सायकलिस्टांचा महासागर; जळगावच्या ७५ सदस्यांसह महापौर दीपमाला काळे ठरल्या आकर्षणाचा केंद्रबिंदू

Editorial DeskBy Editorial DeskJuly 13, 2026Updated:July 13, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव/पंढरपूर प्रतिनिधी : जळगाव सायकलिस्ट ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आलेली वार्षिक पंढरपूर सायकल वारी यंदाही अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे.  महापौर दीपमाला मनोज काळे यांनी स्वतः सायकल चालवत सलग दुसऱ्या वर्षी या वारीमध्ये सहभाग घेतला. रविवारी पंढरपुरात राज्यभरातून आलेल्या ८ हजार सायकलिस्टनी सुरुवातीला पंढरपूर शहराला फेरी मारून नंतर घडवून आणलेल्या भव्य आणि शिस्तबद्ध सायकल रिंगणाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले.

वारीच्या सांगता सोहळ्यात रविवारी, दिनांक १२ जुलै रोजी पंढरपूर येथे एक अभूतपूर्व सोहळा रंगला. संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेल्या विविध सायकलिस्ट ग्रुपच्या सुमारे ८ हजार सायकलपटूंनी पंढरपूरमध्ये सायकलचे एक मोठे आणि भव्य रिंगण तयार केले. या आधी पंढरपूर शहराला देखील त्यांनी पूर्ण एक फेरी मारून मग रिंगण बनवून ते पूर्ण केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही हे शिस्तबद्ध आणि विहंगम रिंगण पाहण्यासाठी पंढरीत मोठी गर्दी झाली होती. या सायकल रिंगणाने प्रत्येक भाविकाचे डोळे आणि मन मोहून घेतले. या ऐतिहासिक रिंगण सोहळ्यात जळगावच्या महापौर दीपमाला काळे आणि जळगावातील ७५ सायकलिस्ट असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभागी झाले होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add